महाराष्ट्र

maharashtra

भाजप आमदारावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By

Published : Dec 30, 2019, 10:53 AM IST

तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर मारहाण करत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अकलूज पोलीस ठाण्यात (ता. माळशिरस, जि. सोलापूर) नोंद करण्यात आला आहे.

राणाजगजितसिंह पाटील
राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद- तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर मारहाण करत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अकलूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला आहे.

कळंब पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्य घरात ठेवल्याचा आरोपातून हिंमतराव पाटील यांना मारहाण केली असून याप्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. मारहाण करणाऱ्या 4 जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यात उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक गणेश भातलवंडे यांसह इतर दोघांचा समावेश आहे.

हेही वाचा - गोडाऊन फोडणारा चोरटा गजाआड; ट्रकसह ३० लाखाचा मुद्देमाल हस्तगत


आमदार पाटील यांची गाडी (क्र. एम एप 43 बी पी 5511) घटनास्थळावरून जप्त केली आहे. पाटील यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप असून कलम 307, 323, 504, 452, 427, 143, 148, 149 सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा नोंद आहे. अकलूज पोलीस ठाण्यात राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, सतीश सत्यनारायण दंडनाईक, गणेश नारायण भातलवंडे यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राणाजगजितसिंह पाटील यांचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - महिलांचा रुद्रावतार... दारू विक्री करणाऱ्या दुकानांची तोडफोड

ABOUT THE AUTHOR

...view details