ETV Bharat / state

महिलांचा रुद्रावतार... दारू विक्री करणाऱ्या दुकानांची तोडफोड

author img

By

Published : Dec 26, 2019, 10:33 PM IST

वडगाव सिद्धेश्वर येथील महिलांनी पुढाकार घेऊन सरपंचाला दारू विक्री बंद करण्याचे निवेदन दिले. त्यानंतर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीची भेट घेऊन त्याला दारूविक्री बंद करण्याची विनंती केली. मात्र, त्याने महिलांना अरेरावीची भाषा वापरली. या प्रकारामुळे चिडलेल्या महिलांनी दारूविक्री दुकानाची तोडफोड केली.

दारू विक्री
दारू विक्री

उस्मानाबाद - जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. याचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. या दारू प्रकरणावर वडगाव सिद्धेश्वर येथील महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. गावातील महिलांनी दारूविक्री सुरू असलेल्या दुकानांची तोडफोड केली.

महिलांनी दारू विक्री दुकानांची तोडफोड केली


महिलांनी पुढाकार घेऊन सरपंचाला दारू विक्री बंद करण्याचे निवेदन दिले. त्यानंतर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तिची भेट घेऊन त्याला दारूविक्री बंद करण्याची विनंती केली. मात्र, त्याने महिलांना अरेरावीची भाषा वापरली. या प्रकारामुळे चिडलेल्या महिलांनी दारूविक्री दुकानाची तोडफोड केली. विक्रेत्याने लपवून ठेवलेली दारूही शोधून नष्ट केली.

हेही वाचा - 'यापुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर अभिषेक नाही,' विश्वस्त समितीच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध

यानंतर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी निवेदन दिले. एकाच वेळी असंख्य महिलांनी दारूविक्री दुकानावर छापा मारल्याने प्रचंड गर्दी झाली होती.

गावातील लोक शाळेच्या आवारात, अंगणवाडी परिसरात दारू पिऊन बसतात आणि शिवीगाळ करतात. त्यामुळे शाळेतील लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होतो. पुरूष घरातील महिलांना मारहाण देखील करतात. याच प्रकाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली. दारू विक्री अशीच सुरू राहिली, तर आत्मदहन करू, असा इशारा या महिलांनी दिला.

Intro:अवैध दारूविक्रीता विनंती करून ऐकला नाही म्हणून महिलांनी तोडले दारूचे दुकान



उस्मानाबाद- जिल्ह्यात सध्या अवैद्य दारूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे यामुळे आज जिल्ह्यातील वडगाव सिद्धेश्वर येथील महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. येथील महिलांनी आज पुढाकार घेत ग्राम पंचायत मध्ये जाऊन सरपंचांना अवैध दारू विक्री बंद करण्याचे निवेदन दिले व अवैद्य दारू विक्री करत असलेल्या व्यक्तीची भेट देऊन त्यालाही दारूविक्री बंद करण्याचे विनंती केली मात्र या दारूविक्री त्याने उलट उत्तर देत महिलांनाच अरेरावीची भाषा वापरली यावेळी चिडलेल्या महिलांनी आपला इंगा दाखवत या अवैध दारूविक्री सुरु असलेल्या दुकानाची तोडफोड करत त्याने लपवून ठेवलेली दारू शोधून नष्ट केली त्याचबरोबर तिथल्या असलेल्या साहित्याची नासधूस करत दारूविक्री बंद पाडली. उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन यांना गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठीच निवेदन दिले यावेळी बहुसंख्य महिलांनी या दारूविक्री दुकानावरती धाड मारल्याने बघणार यांची प्रचंड गर्दी झाली होतीसुट्टीच्या दिवशीही लोक शाळेच्या आवारात अंगणवाडी परिसरात दारू पिऊन बसतात व शिवीगाळ करत असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही त्रास होतो व याचा परिणाम लहान मुलांवर ती होत असल्याचे या महिलांनी सांगितले त्याच बरोबर आहे दारू जर अशीच सुरू राहिली तर आत्मदहन करण्याचा इशारा सदर महिलांनी दिला या आंदोलनात लहान मुलांसह सहभाग घेतला होता अगदी चिमुकल्या बाळाला घेऊनही महिला या आंदोलनात उतरल्या होत्या यावेळी इंदुबाई माने देवकन्या मुळे मनीषा जाधव यांच्यासह बहुसंख्य महिलांनी यात सहभाग घेतला होता


आंदोलक महिला

ByteBody:यात vis व byte आहेत Conclusion:कैलास चौधरी ई. टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.