महाराष्ट्र

maharashtra

कोरोना सावट; एक दिवस आधीच बाप्पांना घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग

By

Published : Aug 21, 2020, 7:58 PM IST

शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर झालेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी काही सार्वजनिक मंडळांनी देखील गणेशाची स्थापना करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक
नाशिक

नाशिक - शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर झालेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी काही सार्वजनिक मंडळांनी देखील गणेशाची स्थापना करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असं असलं तरी घरगुती गणेशाची स्थापना घराघरात होणार आहे. उद्या 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त गणेशमूर्ती विक्री दुकानात होणारी गर्दी लक्षात घेता अनेक भाविक आजच बाप्पांना आपल्या घरी घेऊन जात आहेत.

घरात गणेश मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा करणार असल्याचे भाविकांनीं सांगितले. भाविकांनी लहान गणेश मूर्तीला पसंती दिली आहे. यंदाच्या वर्षी एक ते दीड फुटा पर्यँतच्या गणेश मूर्ती खरेदीला भाविक पसंती देत आहेत. कोरोनामुळे 40 टक्के कमी प्रमाणात गणेश मूर्ती नाशिकचा बाजारात असल्याचे गणेश मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले.

जल प्रदूषण टाळण्यासाठी तसेचं गणेश मूर्ती विसर्जनाच्या दिवशी नदी परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा अनेक भाविकांनी शाडूच्या गणेश मूर्तीला पसंती दिली आहे. विसर्जनाच्या दिवशी घराच्या आवारातच पाण्याच्या बदतील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details