महाराष्ट्र

maharashtra

नाशकात गणपती बाप्पा देणार वाहतूक नियमांचे धडे; मूर्तीकार योगेश टिळेंची संकल्पना

By

Published : Aug 26, 2019, 1:00 PM IST

Updated : Aug 26, 2019, 2:48 PM IST

दरवर्षी दुचाकीच्या अपघातात डोक्याला मार लागून वाहन चालकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. याविषयी प्रबोधन करण्यासाठी मूर्तीकार योगेश टिळे यांना ही संकल्पना सुचली.

मूर्तिकार योगेश टिळे यांनी साकारलेला हेल्मेट गणपती

नाशिक - शहरामध्ये आता चक्क हेल्मेट घालून गणपती बाप्पा वाहतूक नियमांचे धडे देणार आहे. मूर्तीकार योगेश टिळे यांच्या अनोख्या संकल्पनेतून हेल्मेटधारी बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे. दरवर्षी दुचाकीच्या अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने याविषयी प्रबोधन करण्यासाठी त्यांना ही संकल्पना सुचली.

मूर्तीकार योगेश टिळे यांनी साकारलेला हेल्मेट गणपती

नाशिक पोलिसांनी हेल्मेटसक्ती मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. काही प्रमाणात अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणत वाढ देखील झाली. मात्र, असे असले तरी वाहनधारकांकडून अजूनही वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही.

मूर्तीकार योगेश टिळे यांनी बनवलेली ही मूर्ती आणि हेल्मेट शाडू मातीपासून बनवण्यात आल्याने पर्यावरणपूरक आहे. योगेश ही मूर्ती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना भेट देणार आहेत. तसेच पोलीस आयुक्तालयात या मूर्तीची स्थापना करावी, अशी विनंती करणार असल्याचेही टिळे यांनी सांगितले. आता हे हेल्मेटधारी गणपती बाप्पा तरी नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना सद्बुद्धी देवो इतकीच मनोकामना टिळे करत आहे.

Intro:चक्क हेल्मेट घालून गणपती बाप्पा देतील वाहतूक नियमांचे धडे...


Body:नाशिक मध्ये आता चक्क हेल्मेट घालून गणपती बाप्पा वाहतूक नियमांचे धडे देणार आहे...कारण ही तसंच आहे दरवर्षी दुचाकीच्या अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे..नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्ती मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हेल्मेट नं वापरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली,काही प्रमाणात अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणत वाढ देखील झाली,मात्र अस असलं तरी अजून देखील पाहिजे तसे वाहनधारकांन कडून वाहतूक नियमांचे पालन होतांना दिसतं नाही.आणि गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन मूर्तिकार योगेश टिळे यांच्या अनोख्या संकल्पनेतून हेल्मेटधारी बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे,विशेष म्हणजे ही मूर्ती आणि हेल्मेट शाडू माती पासून बनवण्यात आल्याने पर्यावरण पूरक आहे...योगेश ही मूर्ती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना भेट देणार असुन पोलीस आयुक्तलयात ह्या मूर्तीची स्थापना करावी अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी टिळे यांनी सांगितलं.आता हे हेल्मेटधारी गणपती बाप्पा तरी नियमांचे पालननं करणाऱ्या नागरिकांना सद्बुद्धी देवो इतकीच मनोकामना आपण बाप्पा कडे करू शकतो...
बाईट योगेश टिळे मूर्तिकार
टीप फीड ftp
nsk helmet ganpati viu 1
nsk helmet ganpati byte



Conclusion:
Last Updated :Aug 26, 2019, 2:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details