महाराष्ट्र

maharashtra

माहूर गडावरील दत्त शिखर व अनुसया मातेचे मंदिर बंद

By

Published : Feb 25, 2021, 5:45 PM IST

माहूर संस्थानने २२ ते २८ च्या दरम्यान होणारी माघ पौर्णिमा यात्रा रद्द केली आहे. तर माघ पौर्णिमा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

mahur
माहूर गड

नांदेड - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर माहूर गड येथील श्री दत्त शिखर विश्वस्त मंडळाने २२ ते २८ च्या दरम्यान होणारी माघ पौर्णिमा यात्रा रद्द केली आहे. तसेच शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत दत्त शिखर संस्थान बंद राहणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष तथा महंत श्री मधुसूदन भारती महाराज आणि व्यवस्थापकांनी कळवले आहे.

माघ पौर्णिमा यात्राही रद्द

माहूर संस्थानने २२ ते २८ च्या दरम्यान होणारी माघ पौर्णिमा यात्रा रद्द केली आहे. तर माघ पौर्णिमा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रा काळात श्री दत्त शिखर मंदिर व श्री अनुसयामाता माता मंदिर बंद असणार आहे. म्हणून भाविकांनी दत्त शिखर मंदिरावर येऊन गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

मंदीर परिसरात बंदी

मंदिर परिसरात येण्यास संस्थांकडून बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या नियमाचे उल्लघन होईल अशी कोणतीही वर्तवणुक भक्तांनी करू नये असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तथा महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांनी भक्तांना केले आहे.

श्री सत्यगणपती मंदिरही राहणार बंद

अंगारकी चतुर्थीला दाभडच्या सत्यगणपती मंदिरात भक्तांचा मेळाच भरतो. नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील लाखो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु , गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १ व २ मार्चला म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. यामुळे भाविकांना घरी बसूनच गणपतींचे नामस्मरण करावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details