महाराष्ट्र

maharashtra

Sampark Sanvad Yatra : संवाद यात्रेत विसंवादाची ठिणगी ; तेलंगणात सहभागाच्या मुद्यावरून स्थानिक नागरिकांत पडले दोन गट

By

Published : Dec 8, 2022, 10:04 AM IST

नांदेडमध्ये संवाद अभियान समितीच्या वतीने बुधवारी होट्टल येथून संपर्क संवाद यात्रेला सुरुवात (Sampark Sanvad Yatra started in Nanded ) झाली. तेलंगणात सहभागाच्या मुद्यावरून सरपंचांमध्ये दोन गट पडले आहेत. संवाद यात्रेला सुरुवात होट्टलच्या स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याचे दिसून (behalf of Sanvad Abhiyan Samiti) आले.

Sampark Sanvad Yatra
नांदेडमध्ये संवाद अभियान समितीच्या वतीने संवाद यात्रेला सुरुवात

नांदेड : देगलूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील तेरा गावांतील नागरिकांशी संवाद साधतत्यांच्या गावांतील समस्या व तेलंगणा राज्यात जाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना समजून घेत याप्रकरणी शासनाकडे गाऱ्हाणे मांडण्याकरिता संवाद अभियान समितीच्या वतीने बुधवारी होट्टल येथून संपर्क संवाद यात्रेला (Sampark Sanvad Yatra) सुरुवात करण्यात आली. परंतु संवाद यात्रेला होट्टलच्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.

संपर्क संवाद यात्रेला सुरुवात :नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील काही गावांनी शेजारील तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरून बरेच राजकारण तापत आहे. बुधवारी संपर्क संवाद यात्रा काढण्यात आली. होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून या संपर्क संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील जवळपास १०० लोकांची उपस्थिती होती. याप्रसंगी संवाद अभियान समितीचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद (behalf of Sanvad Abhiyan Samiti) साधला.

नांदेडमध्ये संवाद अभियान समितीच्या वतीने संवाद यात्रेला सुरुवात


शासनाकडे गाऱ्हाणे मांडणार :स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सीमावर्ती भागातील नागरिकांन मूलभूत सुविधांसह शासनाच्या कल्याणकारी योजना उपलब्ध होत नाहीत. सातत्याने राज्य सरकारचे दर्लक्ष होत असल्याने संवाद अभियान समितीच्या वतीने पुढाकार घेऊन या सीमावर्ती भागातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन येथील समस्या व नागरिकांच्या भावना जाणून घेऊन याप्रकरणी शासनाकडे गाऱ्हाणे मांडणार असल्याचे ते म्हणाले.


विकासासाठी पुढाकार घ्यावा :शासनाने मुंबई पुण्याकडेच न बघता आमच्यासोबत दुजाभाव करू नये. आम्हीही महाराष्ट्रातीलच आहोत. मराठवाड्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाल्याने आमच्याकडे विकासाच्या योजना उशिरा येतात हे आम्ही समजून घेऊ शकतो. मात्र मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाकडून विशेष अनुशेष भरून काढण्याचा जो प्रयत्न मागील काळात झाला, तसा आमच्या सीमावर्ती भागातील अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना करून राज्य सरकारने या सर्व बाबींचे अवलोकन करून आमच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी असल्याचे (Sampark Sanvad Yatra started in Nanded) सांगितले.

विरोध दर्शविण्यास सुरुवात :दरम्यान, तेलंगणात सहभागाच्या मुद्यावरून सरपंचांमध्ये दोन गट पडले आहेत. तर दुसरीकडे सीमावर्ती भागातील नागरिकांनीही आता विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. शूरवीरांच्या भूमीचा अपमान महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या पराक्रमी राजांची भूमी आहे. दिल्लीचेही तख्त महाराष्ट्रापुढे झुकते. अशावेळी महाराष्ट्रातून तेलंगणात जाण्याचा विचार कशासाठी? आमचा कोणत्याही कृती समितीला विरोध नाही. परंतु आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपल्याच राज्यकर्त्यांना भांडणे उचित राहील. त्याऐवजी तेलंगणात जाण्याचा निर्णय म्हणजे शूरवीरांच्या भूमीचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया होट्टलच्या स्थानिक नागरिकांनी (behalf of Sanvad Abhiyan Samiti Yatra started) दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details