Sanpark Samvad Yatra : सीमावर्ती ३० गावात 'संपर्क संवाद यात्रे'ला बुधवारी होणार सुरुवात

author img

By

Published : Dec 6, 2022, 8:01 PM IST

Sanpark Samvad Yatra

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती (borderline area in Nanded) देगलूर, बिलोली, धर्माबाद तालुक्यातील जवळपास ३० गावांत मुलभूत सुविधा मिळत नसल्याने, तेलंगणात जाण्यासाठी ७ ते १० डिसेंबर या कालावधीत ३० गावात (start on Wednesday in 30 villages) संपर्क संवाद यात्रेचे (Sanpark Samvad Yatra) आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड : सीमावादाचे लोण सांगली -सोलापूरातून मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आले आहे. सीमावर्ती (borderline area in Nanded) देगलूर, बिलोली, धर्माबाद तालुक्यातील जवळपास ३० गावांत मुलभूत सुविधा मिळत नसल्याने, तेलंगणात जाण्यासाठी ७ ते १० डिसेंबर या कालावधीत ३० गावात (start on Wednesday in 30 villages) संपर्क संवाद यात्रेचे (Sanpark Samvad Yatra) आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया देतांना वेगवेगळ्या पक्षांची नेते मंडळी

यात्रेचा दिनक्रम : या यात्रेची सुरुवात 7 डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ८:३० वाजता मौजे हाेट्टल (ता. देगलूर) येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून होणार आहे. त्यानंतर संवाद संपर्क यात्रा येरगी, नागराळ, भक्तापूर, देगलूर, हनुमान हिप्परगा, नरंगल करून यात्रेकरूंचा सांगवी उमर येथे मुक्काम असणार आहे. गुरुवारी (दि. ८) संपर्क यात्रा अभियानाची सुरुवात, मेदनकलुर येथून होऊन तमलुर शेळगाव, शेवाळा, थडी हिपरगा तळी, दौलतापूर, रात्री सगरोळी येथे मुक्कामास असणार आहे. शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी यात्रा बाेळेगाव, कारला पुर्नवसन, येसगी, कारला बुद्रुक, गंजगाव माचनूर, गंजगाव, माचनूर, हुनगुंदा, रात्री नागणी येथे मुक्कामास असणार आहे. शनिवार दिनांक 10 डिसेंबर संगम (ता. बिलोली) येथे यात्रेच्या समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी सीमा भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थिती राहणार असल्याची माहिती संपर्क संवाद अभियान समितीकडून देण्यात आली आहे.



या आहेत मागण्या : शेतीला २४ तास मोफत वीजपुरवठा, मुलीच्या लग्नाकरिता लक्ष्मी कल्याण योजना, शेतकऱ्यांना प्रति एकर १२०००/ रुपये दरवर्षी दिले जावेत, खते कीटकनाशक औषधी ५० ℅ टक्के अनुदानावर देण्यात यावीत, घरकुल योजनेत पाच लाखापर्यंत घर बांधून दिले जावे, मागणी करेल त्याला शेळ्या मेंढ्या मोफत पुरवठा करणे, मागासवर्गीयांना व्यवसाय करिता दहा लाखाचे अनुदान देणे, वयोवृद्धांना दरमहा २०००/ रुपये मानधन दिले जावे. दिव्यांगांना दरमहा ३००० रुपये मानधन देण्यात यावे, दुध डेअरीकरिता पाच लाखाचे राेख अनुदान, यासह इतर १२ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.



यात राजकारण : सीमा भागातील एकही गाव तेलंगणा राज्यात जाऊ इच्छित नाही, काही लोक यात राजकारण करत आहेत, असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी केला आहे. खासदार चिखलीकर पत्रकारांशी बोलताना सीमावर्ती भागातील प्रश्न सोडवण्यासाठी, आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी आमचे सरकार नव्हते. आता गावकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या जातील, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.



अनेकांचे आरोप-प्रत्यारोप : मात्र शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी महाराष्ट्राचे तुकडे पडण्यासाठी कर्नाटकला केंद्र सरकाने सुरुंग लावल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्या पासून महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा काम करत आहे, अशी टिका सुद्धा मारावर यांनी केली. तसेच भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी थेट अशोक चव्हाण वर टीका करत, जिल्यात 2 वेळेला मुख्यमंत्री, मंत्री, खासदार असे पद भूषवले कधी सीमा भागात गेले नाही, त्यांची कधी चौकशी केली नाही. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संवेदनशील आहे. तेलंगणात जायची मागणी करणे ही खेदजनक आहे. सरकार तात्काळ त्यांच्या मागणीची दखल घेऊन विकास काम सुरु करेल. जे सत्तेत होते आता विरोधात आहे. त्यांनी असं राजकारण करू नये, असा सल्ला देखील प्रवीण साले यांनी विरोधकांना दिला.

सरपंच मंडळींची खंत : तेलंगणा राज्यात निवडणुका आल्या की, तिथले मुख्यमंत्री महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळी अमिश दाखवत सीमावर्ती भागातील नागरिकांना आकर्षित केल्या जातं. मात्र आजवर तिथल्या एकाही राज्यसभेच्या खासदाराने महाराष्ट्राच्या विकासासाठी एक रुपया देखील दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला तेलंगणात जायचं नाही. पण आमचा विकास करा, अशी भूमिका सीमावर्ती भागातील सरपंच मंडळींनी व्यक्त केलीय.

आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्याकडे मांडू : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथे तेलंगणाच्या सीमावर्ती गावातील सरपंच मंडळींची आज सेनेच्या शिंदे गटाने बैठक बोलावली, या बैठकीला सीमावर्ती भागातील वीस गावातील सरपंच आणि उपसरपंचानी सहभाग नोंदवला. या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपस्थित सरपंचांनी केला आहे. मात्र आम्हाला तेलंगणात जायचं नाही आहे. आम्ही आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्याकडे मांडून आमच्या समस्या सोडवून घेऊ, असा ठराव या बैठकीत सरपंच मंडळींनी केला आहे.

काय होणार ते भविष्यातच समजणार : उद्यापासून संपर्क संवाद अभियान सीमाप्रश्न कृती समितीच्या वतीने उद्यापासून सीमावर्ती भागात संपर्क संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. तेलंगणात मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि महाराष्ट्रातील आपले हाल या विषयावर ही समिती लोकांना जागृत करणार आहे. त्याचवेळी धर्माबाद तालुक्यातील सरपंचाचा एक मोठा गट मात्र तेलंगणात जायचं नाही, अशी भूमिका घेत आहे. त्यामुळे तेलंगणात जाण्याच्या मागणीचा जोर ओसरतो की काय अशी चर्चा आता रंगली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.