महाराष्ट्र

maharashtra

Accident On Samruddhi Highway समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत आज बैठक, अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांवर होणार चर्चा

By

Published : Dec 30, 2022, 1:02 PM IST

महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग म्हणून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) महामार्गाचा उल्लेख करण्यात येतो. मात्र समृद्धी महामार्गाचे ( Maharashtra Samruddhi Mahamarg ) उद्घाटन केल्यापासून या महामार्गावर अपघाताची मालिकाच सुरू झाली. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठक ( RTO Officers Meeting In Nagpur Today ) होत आहे. या बैठकीत शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या जिल्ह्यातील परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Accident On Samruddhi Highway
समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त कार

नागपूर -हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) महामार्गावर ( RTO Officers Meeting ) होणाऱ्या अपघातासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही बैठक ( RTO Officers Meeting In Nagpur Today ) होणार आहे. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्ग

नागपूर ते शिर्डी महामार्गावरील जिल्ह्यातील अधिकारी आमंत्रितसमृद्धी महामार्गाची ( Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Highway ) लांबी, या महामार्गावर झालेल्या अपघातांची माहिती, या महामार्गावर वाहतुकीस शिस्त लागावी तसेच अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करणे इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी या महामार्गावर ( RTO Officers Meeting In Nagpur ) येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना या बैठकीसाठी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर पूर्व, वर्धा, बुलढाणा, वाशिम, जालना आणि श्रीरामपूर यांचा समावेश आहे.

परिवहन आयुक्तांनी केली पाहणीपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) नागपूर ते पुलगाव दरम्यानच्या समृद्धी महामार्गाची ( Maharashtra Samruddhi Mahamarg ) संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त परिवहन आयुक्त देवेंद्र पाटील,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, नागपूर शहरचे प्रादेशिक परिवहन ( Preventing Accident On Samruddhi Highway ) अधिकारी रवींद्र भुयार, नागपूर ग्रामीणचे परिवहन अधिकारी विजय चव्हाण, अधीक्षक अभियंता अश्विनी भोगे यांच्यासह परिवहन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details