महाराष्ट्र

maharashtra

Devendra Fadnavis on OBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येणार नाही - देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 8:13 PM IST

Devendra Fadnavis on OBC Reservation : नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. त्या ठिकाणी आज उपममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिलीय. (Devendra Fadanvis in Nagpur)

Devendra Fadanvis on OBC Reservation
ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नागपूर Devendra Fadnavis on OBC Reservation :ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. ते आज नागपुरात बोलत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीनं नागपूर येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना संबोधित केलंय. यावेळी बबनराव तायवाडे, सुधाकरराव कोहळे, समीर मेघे,परिणय फुके, आशीष देशमुख, प्रवीण दटके व इतरही नेते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

राज्य सरकाची ठाम भूमिका :यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांचीसुद्धा भेट घेतलीय. ओबीसींच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येणार नाहीत किंवा ते कमी होऊ देणार नाही. ओबीसींवर अन्याय होणार नाही, ही राज्य सरकाची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाची जी अपेक्षा आहे, ती मी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं, ते परत मिळावं, ही ती भूमिका आहे. यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आलीय. भोसले समितीनं सुचविलेल्या उपाययोजना सुद्धा हाती घेण्यात आल्या आहेत, असंही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadanvis in Nagpur)


शिंदे समिती :आता शिंदे समिती गठीत करण्यात आलीय. ज्यांचे मत आहे ते आधी कुणबी होते, त्यांना नंतर मराठा ठरविण्यात आलं, त्याची तपासणी करण्यासाठी ही समिती आहे. एक महिन्यात त्यांचा अहवाल येईल. दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकावे, अशी परिस्थिती नाही किंवा तशी सरकारची भावना नाही. प्रत्येक समाजाचे प्रश्न स्वतंत्रपणेच सोडविले पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत, असंही देवेंद्र फडणवीसयांनी यावेळी सांगितलंय. (Nagpur hunger strike)



ओबीसी हिताचे २६ जीआर :ओबीसी समाजासाठी २६ विविध जीआर आम्ही काढले होते. त्यातील अनेक निर्णय अमलात आले, काहींवर अंमलबजावणी होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहाबाबत परवाच बैठक झाली. काही ठिकाणी जागा भाड्याने घेण्याची सुद्धा तयारी केलीय. शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. आता तर ओबीसींसाठी 10 लाख घरांची मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतलाय. तुमच्या ज्या अन्य मागण्या आहेत, त्याबाबत येत्या आठवडाभरात मुंबईत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि अन्य संघटनांची एकत्रित बैठक घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिलीय. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ती ओबीसींच्या हिताची योजना आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय. (OBC Reservation)


कंत्राटी भरती तात्पुरती :कंत्राटी भरतीसंदर्भात जाणिवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. एक बाब स्पष्टपणे सांगतो की, नियमित आस्थापनेवरील कोणत्याही जागा कंत्राटी पद्धतीनं भरल्या जाणार नाहीत. 75 हजार पदभरतीचा निर्णय आम्ही घेतला, कार्यवाही सुरू केलीय. आता ती भरती दीड लाखांच्या घरात जात आहे. कायमस्वरुपी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीनं तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करावी लागतं आहे. कारण कामं थांबवू शकत नाही. कायमस्वरुपी भरतीला वर्ष- दीडवर्ष लागतात. राज्यात ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. कंत्राटी भरतीचा हा निर्णयसुद्धा गेल्या सरकारनेच घेतलेला आहे. त्यात आम्ही केवळ कामगारांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळतील, अशी सुधारणा केलीय. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. युवकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

हेही वाचा :

  1. DCM Devendra Fadanvis in Pushkar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुष्करमध्ये घेतले ब्रह्मदेवाचे दर्शन; पहा व्हिडिओ
  2. Maratha Protest Jalna: अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार मनोज जरांगेची भेट! शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची फसवणूक- अतुल लोंढेंचा आरोप
  3. Devendra Fadnavis : सत्तेत असताना माशा मारल्या का? देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details