Devendra Fadnavis : सत्तेत असताना माशा मारल्या का? देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 12:44 PM IST

thumbnail

छत्रपती संभाजीनगर : Devendra Fadnavis : संभाजीनगरमध्ये आजपासून राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) अनेक निर्णय घेतले. तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होतात तेव्हा तुम्ही काय केलं? अडीच वर्ष तुम्ही माशा मारत होतात का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. आम्ही ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्यातील एखादी शिल्लक असेल. मात्र, इतर अनेक घोषणा पूर्ण झाल्या आहेत. 'मराठवाडा वॉटर ग्रीड'सारख्या प्रकल्पाचा मुडदा पाडण्याचं काम विरोधकांनी केलं. यासह अनेक योजनांचा देखील त्यांनी मुडदा पडलाय आणि आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर केली.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.