महाराष्ट्र

maharashtra

Teachers Elgar On Teacher Day: शिक्षक दिनाला 60 हजार शिक्षकांचा एल्गार, काळी फीत लावून शासनाचा निषेध करणार

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 4:32 PM IST

Teachers Elgar On Teacher Day: राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच राज्यातील हजारो शिक्षक आंदोलन करणार आहेत. (60 thousand teachers Elgar) काळ्या किती लावून हे आंदोलन करणार आहेत. एक दिवसावर शिक्षक दिन आलेला आहे. परंतु पेन्शन (Teachers Pension Demand) आणि शिक्षकांची रिक्त पदे (Teachers Vacancies) बाबत अद्यापही अंमलबजावणी नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासन दिले. अंमलबजावणी केलेली नाही. म्हणून शिक्षकांकडून राज्यात ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयात हे आंदोलन होणार आहे.

Teachers Elgar On Teacher Day
शिक्षकांचा एल्गार

शिक्षकांच्या मागण्यांविषयी बोलताना मुकुंद आंधळकर

मुंबईTeachers Elgar On Teacher Day:राज्यामध्ये चार महिन्यांपूर्वी शिक्षक आणि शासकीय कर्मचारी, निम्नशासकीय कर्मचारी यांनी पेन्शनकरिता जोरदार आंदोलन केले. (60 thousand teachers Elgar) त्याचा फटका महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापासून तर गावांच्या कार्यालयालादेखील बसला. त्यावेळेला शासनाने शिक्षकांच्या संदर्भात निर्णय करण्याचे आश्वासन दिले होते. (Teachers Pension Demand) परंतु अंशतः अनुदानावरील काम करणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. राज्यात शिक्षकांची रिक्त पदे भरण्या आली नाहीत. 1 नोव्हेंबर, 2005 नंतर जे शिक्षक नोकरीला लागले. (Teachers Vacancies) त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या संदर्भात कोणताही ठोस निर्णय केला गेला नाही. त्यामुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक काळी फीत लावून 5 सप्टेंबर 2023 रोजी आंदोलन करणार आहेत.


विद्यार्थी तांत्रिक शिक्षणापासून वंचित:माहिती आणि तंत्रज्ञान हा विषय आता इयत्ता पहिलीपासून सर्व शाळांमध्ये शिकवला जातो. यासंदर्भात शासनाने मान्य केल्यानंतरदेखील आयटी या विषयांमध्ये हजारो शिक्षकांची गरज असताना अद्यापही शासनाने अनुदानित शिक्षकांची भरतीच केलेली नाही. त्यामुळे हजारो शाळांमधील हे पद भरले गेले नाहीत. तर तेथील मुलांना शिक्षण कसे मिळणार? असा प्रश्न कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी उपस्थित केलेला आहे.

म्हणून काळी फीत लावून काम:शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येसाठी जे निकष लावले आहेत. त्याबद्दल शिक्षकांनी सातत्याने शासनासमोर गाऱ्हाणे मांडलेले आहे. शासनाने शाळा संहिता ठरलेली असताना त्याऐवजी दुसरेच निकष कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्या संदर्भात लावले. त्यामुळे तेथे देखील शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्यांचे पद रिक्त आहेत. शासन निर्णयावर अंमलबजावणी करत नाही. म्हणून शिक्षक दिनाच्या दिवशी राज्यभर काळी फीत लावून हे शिक्षक आंदोलन करणार आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन पाळले नाही:कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे नेते प्राध्यापक मुकुंद आंधळकर म्हणाले, राज्यात शिक्षक दिनी साठ हजार शिक्षक एल्गार करणार आहेत. काळी फीत लावून ते आंदोलन करणार आहेत. शिक्षकांच्या पेन्शन पासून अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. शासनाने आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन आम्ही करणार आहोत. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावी परीक्षेच्या वेळी आम्ही केलेला बहिष्कार मागे घ्यायला लावला होता. मागण्या पूर्ण करू, असे म्हटले होते. परंतु त्याच्यावर अद्यापही कार्यवाही नाही.

हेही वाचा:

  1. Students Movement In ZP : कोणी शिक्षक देता का शिक्षक? शेकडो विद्यार्थी धडकले माटरगाव बुद्रुक जिल्हा परिषदेवर
  2. Udise Plus Issue : विद्यार्थ्यांना शिकवायचे की ५१ ऑनलाईन फॉर्म भरायचे? यु-डायस प्रणालीवरून शिक्षकांमध्ये नाराजी
  3. School Problems In Nagpur: महिनाभरापासून शाळेत मास्तरच नाही; निराश विद्यार्थ्यांनी गाठले जिल्हा परिषद कार्यालय

ABOUT THE AUTHOR

...view details