महाराष्ट्र

maharashtra

Monsoon Session 2023 : विरोधी पक्ष आहे कुठे? अजित पवार आमच्याकडे आल्याने...; सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका

By

Published : Jul 16, 2023, 7:33 PM IST

Updated : Jul 16, 2023, 8:21 PM IST

राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र, विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Monsoon Session Press
Monsoon Session Press

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

मुंबई :पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला, विरोधी पक्षाला चहापानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण, ते आले नाहीत. तसे पत्र विरोधी पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. विरोधी पक्षाला विषय माहीत नाही. पत्राऐवजी त्यांनी ग्रंथ लिहिले, लक्षवेधी एकत्रित करून त्याचे पत्र दिल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सरकार असंवैधानिक कसे? : विधानसभा हे लोकशाहीचे प्रतीक आहे. त्यामुळे समोर येणाऱ्या मुद्द्यांवर सत्ताधारी चर्चा करण्याच्या तयारीत आहेत. जास्तीत जास्त जनहिताचा विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न करू. तरीही विरोधीपक्ष मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. वैध सरकारला घटनाबाह्य ठरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विरोधकांना चांगले दिसत नाही :विरोधी पक्ष गोंधाळलेला आहे. विविध प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. मात्र विरोधकांकडून तसे होतांना दिसत नाही. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडायला हवी असे, मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. बाळासाहेबांनी आम्हाला चांगल्याला चागंले म्हण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे आम्ही चांगल्याला चांगलेच म्हणतो. मात्र, विरोधकांना चांगले काही दिसत नाही. असे असले तरी राज्यात विरोधी पक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

फडणवीस ऑल राऊंडर :अजित पवार सकाळीच कामाला सुरवात करतात. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो, तर फडणवीस ऑल राऊंडर आहेत. त्यामुळे जनतेचे पश्न आम्ही नक्कीच सोडवण्याचे प्रयत्न करु अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. विरोधक रोज सकाळी उठून म्हणाचे सरकार आज पडणार, उद्या पडणार. मात्र, सरकार पडण्याऐवजी मजबूत होत, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. आज सकाळीच अमरावतीत टेक्‍सटाईल पार्कचे लोकार्पण झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुश गोयल यांना पत्र पाठवले होते. त्यामुळे तो प्रकल्प आपल्याला मिळाला.

उमेदवारांना थेट नियुक्त्या : काही झाले तरी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असातांना महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. नंतर आपला क्रमांक घसरला. त्यामुळे आता पुन्हा राज्य झेप घेणार अशा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सरकार चांगले काम करत आहे. बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सरकार राबवते आहे. जेष्ठांना आपण फ्री प्रवासाची सुविधा दिली, 75 हाजार नोकऱ्या उपलब्ध केल्या. आता आम्ही थेट उमेदवारांना नियुक्त्या देत आहेत, असे चांगले निर्णय घेतले अशी माहिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आरोग्यासाठी सरसकट पाच लाखांची मदत : जनतेच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सहय्यता निधीचे 86 कोटींचे वाटप नागरिकांना करण्यात आले आहे. आता पिवळ्या, केसरी, पांढऱ्या राशनकार्ड ऐवजी सगळ्यांना पाच लाखांची सरसरट मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात 9 ठिकाणी मेडीकल कॉलेज निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच त्याचे काम सरु होईल. समुद्धी महामार्गावर 33 लाख झांडांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक प्रकल्प आपण राबतो आहे. पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम करतो आहे.

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे : पुणे ते मुंबई प्रवास आता अर्धा तासाने वाचणार आहे. 50 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. आठवीपर्यंत सर्वांना गणवेश मोफ देण्यात येणार आहे. मुंबईत खड्डे पडले आहेत. या नंतर तुम्हाला खड्डे दिसणार नाही. पुढील तीन वर्षात खड्डेमुक्त मुंबई होणार,अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे. मुंबईच्या कामावर विरोधक दिशाभूल करीत आहे. त्यांना आरोप करायची सवय आहे. जे आरोप होता आहेत त्यांची देखील चौकशी केली होईल. काही आरोप बिनबुडाचे आहेत. मुंबईच्या महापालिकेच्या ठेविबाबत शिंदे म्हणाले की, विरोधकांनी खोटा प्रचार सुरू केला आहे. महापालिकेच्या ठेवीत वाढ झाली आहे. मात्र, विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे त्यांच्या पोटावर उपचार करण्यासाठी सरकारने बाळासाहेब ठाकरे रुग्णालय बांधले आहे. तेथे जाऊन त्यांनी उपचार घेतले पाहिजे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा -Monsoon Session : राज्यात कलंकीत सरकारचा बोगस कारभार; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Last Updated : Jul 16, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details