महाराष्ट्र

maharashtra

शेतीच्या वादातून तुफान हाणामारी ; एकाचा मृत्यू, 4 गंभीर

By

Published : May 3, 2020, 9:51 AM IST

देऊळवाडी गावातील गचाटे यांच्या शेतामध्ये सध्या मशागतीची कामे सुरू आहेत. मशागत करीत असताना बंधाऱ्यावरुन भावा-भावात हाणामारी सुरू झाली. हा वाद एवढ्या विकोपाला गेले की यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

storm-fighting-over-agricultural-disputes-one-dead-in-udgir-latur
शेतीच्या वादातून तुफान हाणामारी

उदगीर (लातूर) - उदगीर तालुक्यातील देऊळवाडीत येथे शेतीच्या वादातून हाणामारी झाली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरुन ही घटना झाली आहे.

शेतीच्या वादातून तुफान हाणामारी

हेही वाचा-केंद्राने 'आयएफसी' स्थलांतरित करण्याचा निर्णय मागे घ्यावा - अरविंद सावंत

देऊळवाडी गावातील गचाटे यांच्या शेतामध्ये सध्या मशागतीची कामे सुरू आहेत. मशागत करीत असताना बंधाऱ्यावरुन भावा-भावात हाणामारी सुरू झाली. हा वाद एवढ्या विकोपाला गेले की यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

गचाटे यांच्या शेतातील बंधाऱ्यावर जीसीबीच्या साहाय्याने डागडूजी सुरू होती. याप्रसंगी भावकीतील काही जणांनी येऊन डोळ्यात मिरचीची पुड टाकत कत्ती व कुऱ्हाडीने वार केले. यात रुद्रापा गचाटे यांचा मृत्यू झाला. तर संगमेश्वर गचाटे, बालाजी गचाटे, सतिश गचाटे व दत्ता गचाटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उदगीरच्या धन्वंतरी रुगाणालयात दाखल केले आहे. जखमी पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातुरच्या शासकीय रुग्णालायात पाठवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details