महाराष्ट्र

maharashtra

Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरेदी केली आणखी एक म्हैस; 'हे' आहे कारण

By

Published : Dec 4, 2022, 5:45 PM IST

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Former minister Hasan Mushrif ) यांनी ऑगस्टमध्ये म्हैस खरेदी केल्यानंतर आता आणखी एक म्हैस खरेदी केली ( Hasan Mushrif bought one more buffalo ). ही म्हैस हरियाणातून खरेदी केली आहे. गोकूळ दूध संघासाठी कोणत्याही परिस्थितीत 25 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर जिल्ह्यातच दूध उत्पादन वाढ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Hasan Mushrif
हसन मुश्रीफ

कोल्हापूर : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Former minister Hasan Mushrif ) यांनी हरियाणामधून दुसरी म्हैस खरेदी केली ( Hasan Mushrif bought one more buffalo ) आहे. याआधी चार महिन्यांपूर्वी त्यांनी पहिली म्हैस विकत घेतली होती. गोकुळ दूध संघाचे संकलन वाढविण्याच्यादृष्टीने नेतेमंडळी, संचालक, कर्मचाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी म्हशी घेण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्याची सुरुवात स्वतःपासूनच केली होती. आता त्यांनी आणखी एक म्हैस खरेदी केली आहे.

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हरियाणामधून म्हैस खरेदी केली


25 लाख लिटर संकलना उद्दिष्ट : याबाबत अधिक माहिती अशी, वाढते तापमान आणि लंपी रोगामुळे जागतिक पातळीवर दूध उत्पादनामध्ये 12 टक्के घट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध संकलनावरही याचा परिणाम झाला आहे. मुंबईत म्हशीच्या दुधाची 25 लाख लिटर विक्री होऊ शकते. मात्र, गोकुळ दूध संघाचे संकलन 12 लाख लिटरवर आहे. कोणत्याही परिस्थितीत 25 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर जिल्ह्यातच दूध उत्पादन वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातून बाहेर जाणारे दूध थांबले पाहिजे, असेही माजी मंत्री मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.


प्रत्येकी दोन म्हैशी पाळायच्याच :आमदार मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखांवर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक -एक म्हैस जरी घेतली तरी जिल्ह्याच्या दूध उत्पादनामध्ये दहा ते बारा लाख लिटरने वाढ होऊन 25 लाख लिटर संकलनाचा टप्पा सहज गाठू शकतो. चार महिन्यापूर्वी संचालक मंडळाच्या उपस्थितीत आम्ही दूधवाढीसाठी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये त्यांनी संकल्प केला होता की नेत्यानी व संचालकानी प्रत्येकी दोन म्हशी घेतल्या पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेतलीच पाहिजे. शेतकऱ्यांनाही एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी केडीसीसी बँक अर्थसहाय्य करील व गोकुळ दूध संघ जास्तीत -जास्त अनुदान देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, नितीन दिंडे व सतीश घाटगे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details