महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Nov 8, 2020, 7:40 PM IST

Updated : Nov 8, 2020, 7:54 PM IST

हिंगोली एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

farmer-commits-suicide-in-hingoli
हिंगोलीत कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एका कर्जबाजारी शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सुभाष शेषराव राठोड (45 रा.भंडारी ता. सेनगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. सुभाष हे सकाळी शेतात कामानिमीत्त जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले, परंतु ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाही. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता ते शेतातील एका झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले. यावर्षी परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात राधेश्याम देवीदास राठोड यांच्या फिर्यादीवरून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

वर्षभरात 27 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिकांच्या नुकसानाला कंटाळून जिल्ह्यात वर्षभरामध्ये 27 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या संपूर्ण प्रकाराने जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे.

हेही वाचा- चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालाच्या घरी एनसीबीचे छापे; ड्रग्ज जप्त

Last Updated :Nov 8, 2020, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details