महाराष्ट्र

maharashtra

Corona crisis In Gondia : कोरोना संकटाने संसाराचा गाडा कोलमडला! ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

By

Published : Jan 31, 2022, 12:47 AM IST

Updated : Feb 3, 2022, 12:31 PM IST

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनामुळे अनेकांचे घर उधवस्त झाले आहेत. या कोरोना विषाणूने कोणी आपले पती गमावले, कोणी आपले वडील गमावले, तर कोणी आपले मुलं देखील गमावले आहेत. (Corona crisis In Gondia) या घटनांमुळे आजच्या घडीला अनेक कुटुंब असेही आहेत उदरनिर्वाह कसे चालवायचे हा देखील मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशाच एका कुटुंबासोबत ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे.

कोरोना संकटाने संसाराचा गाडा कोलमडला! ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट
कोरोना संकटाने संसाराचा गाडा कोलमडला! ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

गोंदिया - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनामुळे अनेकांचे घर उधवस्त झाले आहेत. (Loss of family due to corona) या कोरोना विषाणूने कोणी आपले पती गमावले, कोणी आपले वडील गमावले, तर कोणी आपले मुलं देखील गमावले आहेत. या घटनांमुळे आजच्या घडीला अनेक कुटुंब असेही आहेत उदरनिर्वाह कसे चालवायचे हा देखील मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. (Corona crisis In Maharashra) अशाच एका कुटुंबासोबत ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे.

व्हिडिओ

१५ एप्रिल २०२१ ला सकाळी मृत्यू झाला

गोंदिया शहरात राहणारे चौरसिया कुटुंबीय यांच्या कुटुंबियातील मुख्य सदस्य गोपाल चौरसिया हे पिट गिरणी चालून आपले व आपल्या कुटुंबाचा उदर्निर्वाह चालवत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोपाल चौरसिया आणि त्यांच्या पत्नी सुनीता चौरसिया हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले व त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले. गोपाल यांच्या पत्नी ३ दिवसात रुग्णालयातील उपचार करून घरी परतल्या. मात्र, त्या वेळेस कोरोनाने असा हा-हाकार गाजवला की त्यामध्ये लोकांना ऑक्सिजन न मिळाल्याने लोकांचे मृत्यू होत होते. हे बघत असताना गोपाल चौरसिया यांनी बघितले व त्यांनी आपल्या घरी जाण्याचा विचार करत १४ एप्रिल २०२१ ला घरी परत आले. मात्र, त्यांचा ऑक्सीजन लेव्हल कमी असल्याने त्यांचा १५ एप्रिल २०२१ ला सकाळी मृत्यू झाला.

मुली शिक्षण घेत असल्याने त्यांच्या शिक्षण फीस माफ करावी

या घटनेनंतर कुटुंबार मोठे संकट कोसळले. गोपाल चौरसिया यांच्यामागे त्यांच्या पत्नी सुनीता, मोठी मुलगी श्रेया चौरसिया (२१ वर्ष), कुंकुम चौरसिया (१४ वर्ष), आणि आदिती चौरसिया (८ वर्ष) असे कुटुंब आहे. यांना आता घर कसे चालणार या विचाराने सुनीता चौरसिया यांनी पती चालवत असलेली पीठ गिरणी आपल्या हाती घेत पिट गिरणी सुरु केली. मात्र, तीन मुलींचा व आपला उदरनिर्वाह व मुलींचे शिक्षण त्यातच ऑनलाईन शिक्षण होत असल्याने मोबाईलचे रिचार्ज करणे ह्या सगळ्या गोष्टी करणे खूब कठीण जात आहे. त्यामुळे शासनाने आपल्या कुटूंबाला थोडी फार मदत करावी. तसेच, मुली शिक्षण घेत असल्याने त्यांच्या शिक्षण फीस माफ करावी अशी विनंती केली आहे.

१ हजार ३१० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत तर ऍक्टिव्ह रुग्ण

गोंदिया जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेमुळे कोरोना बांधीत संख्या वाढतांना दिसत आहे. मात्र, गंभीर बाब म्हणजे बांधितांची संख्या वाढत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहे. आज पर्यंत जिल्हयात कोरोनाने ४५ हजार २१७ रुग्ण सकारात्मह झाले आहेत. तर आजपर्यंत डिस्चार्ज होऊन घरी जाणारे ४३ हजार १८६ लोक आहेत. तर, १ हजार ३१० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत तर ऍक्टिव्ह रुग्ण १ हजार २७४ रुग्ण हे घरी विलगीकरण मध्ये आहेत. सध्या जिल्ह्या दररोज १०० च्या वर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

हेही वाचा -Kirit Somaiya Criticized Sanjay Raut : 'संजय राऊत कुटुंबाची वाईनरीमध्ये पार्टनरशिप'

Last Updated : Feb 3, 2022, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details