ETV Bharat / city

Kirit Somaiya Criticized Sanjay Raut : 'संजय राऊत कुटुंबाची वाईनरीमध्ये पार्टनरशिप'

author img

By

Published : Jan 30, 2022, 4:56 PM IST

Updated : Jan 30, 2022, 5:27 PM IST

भाजपा नेते किरीट सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत ( ShivSena MP Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे वाईनबद्दल इतके का बोलत आहेत. संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगपतीसोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप ( Sanjay Raut Partnership with Wine Producer ) आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi Government ) राज्यातील सुपरमॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी ( Permission to Sell Wine in Super malls and Grocery Stores ) देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून भाजपा नेते किरीट सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत ( ShivSena MP Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे वाईनबद्दल इतके का बोलत आहेत. संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगपतीसोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप ( Sanjay Raut Partnership with Wine Producer ) आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. ते मुंबईत त्यांच्या निवस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रतिक्रिया देतांना भाजपा नेते किरीट सोमैया
  • 'महाराष्ट्र नाही तर 'मद्यराष्ट्र'

संजय राऊत सांगतात वाईन म्हणजे दारु नव्हे. तर मग वाईन काय आहे. आपला आणि वाईनचा संबंधच काय? मी माझ्या आयुष्यात कधी अंडी खाल्ली नाहीत, बीडी ओढली नाही की सिगारेटही ओढली नाही. वाईन आणि बियरही नाही. मग तुमचा आणि वाईनचा संबंध काय? असा सवाल सोमैया यांनी उपस्थित करत ठाकरे सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायचे काम करत आहे, असा आरोपही सोमैया यांनी केला आहे.

  • संजय राऊत कुटुंबाची वाईनरीमध्ये पार्टनरशिप?

व्यावसायिक अशोक गर्ग हे २००६ पासून मॅगपी ग्रुप चालवतात. २०१० मध्ये त्यांनी अजून एक कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हॉटेल, पब येथे वाईन वितरित करणे हा आहे. अशोक गर्ग यांची महाराष्ट्रात मोनोपॉली आहे. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अधिकांश वाईन या ग्रृपची जाते. याची वार्षिक उलाढाल १०० कोटींची आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या व्यवसायात पार्टनरशिप केली. त्यांच्या दोन्ही मुली विदिता व उर्वशी मॅगपी कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्याचा दावाही किरीट सोमैया यांनी याप्रसंगी केला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On Mahatma Gandhi : "...तर त्यांनी गांधींना नव्हे तर जिनांना गोळ्या घातल्या असत्या"

Last Updated : Jan 30, 2022, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.