महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Visarjan 2022 : धुळ्यातील मशिदीची अजान आणि खुनी गणपतीची आरती एकाचवेळी

By

Published : Sep 10, 2022, 12:04 PM IST

khuni Ganapati
खुनी गणपती

आतापर्यंत तुम्ही मुंबई-पुण्यातील अनेक गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) मंडळ पाहिली असतील. परंतू धुळ्याच्या या खुनी गणपतीला तोड ( khuni Ganapati ) नाही. गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या गणपतीची मिरवणूक ( Ganesh Visarjan 2022 ) सर्वाथाने वेगळी आणि महत्त्वपूर्ण आहे.

धुळे - १५७ वर्षांची परंपरा असलेल्या धुळे शहरातील जुने धुळे भागातील मानाच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक ( Ganesh Visarjan 2022 ) पालखी द्वारे याच भागातील खुनी मशिदी समोर येताच गणपतीच्या पालखी मशिदीवरून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात येते. दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधामुळे सण, उत्सव साजरे होऊ शकले नाही. हिंदू - मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीच्या ( khuni Ganapati ) मिरवणुकीनंतर शहरातील इतर गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या गणपतीची पालखी मिरवणुकीत गुलाल, वाजंत्री, धांगड - धिंगड याला सक्त मनाई आहे. पालखी मिरवणुकी दरम्यान गणेश भक्ताच्या कपाळी काळा बुक्का लावण्याची तसेच पालखीत केवळ टाळ, मृदूंगाच्या तालावर गणपती बाप्पांचा जयघोष करण्याची १५७ वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

धुळ्यातील मशिदीची अजान आणि खुनी गणपतीची आरती एकाचवेळी

मशिदीची अजान अन् खुनी गणपतीची आरती एकाचवेळी - पालखी मिरवणुकीच्या मार्गात गल्लीतील महिला रांगोळ्या रेखाटतात, घराघरातून पालखीचे आपापल्या परिस्थितीनुसार स्वागत करण्यात येते. जुने धुळे भागातील खुनी मशिदीजवळ ज्यावेळी ही गणपतीची पालखी येते. त्यावेळी अजानची वेळ झालेली असते. एकीकडे मशिदीवरील भोंग्यातून अजाणचा ध्वनी सुरु असतो तर दुसरीकडे मशिदीवरून बाप्पांच्या पालखीवर पुष्प वृष्टी करण्यात येते. अजान संपल्यानंतर मशिदीच्या प्रमुखाच्या हस्ते बाप्पांची विधिवत पूजा ( Aarti Of khuni Ganapati ) केली जाते. त्या नंतर गणपतीची पालखी पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होते. हा सोहळा याची देही ,याची डोळा पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटलेला असतो.





खुनी गणपती विसर्जन मिरवणुकीचा इतिहास -धुळ्यातील ‘खुनी गणपती’ची विसर्जन मिरवणूक सर्वांनी आदर्श घ्यावा अशी आहे. खुनी गणपती हा धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. १८९५ साली खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. असे असले तरी काही वयस्कर मंडळी तसेच जुने धुळे भागात असलेल्या या मानाच्या खुनी गणपती मंदिराच्या ठिकाणी नमूद स्थापना वर्ष नुसार १८६५ मध्ये या गणपतीची स्थापना झाली. एका वर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक जुने धुळे भागातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात होती. त्यावेळी गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला, काही वेळातचे या भांडणाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी उपस्थित ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला, ज्यामध्ये बरेच लोक मृत्यूमुखी पडले. यावेळी धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या वेळी मशिदीच्या परिसरात खून होतात अशी समजूत रुढ झाली. या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचं ‘खुनी गणपती’ हे नाव प्रचलीत झाले. यानंतर तत्कालिन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला. दोन्ही गटांमध्ये एकोपा रहावा यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश आले. त्यावर्षापासून आजपर्यंत धुळ्यातील ‘खुनी गणपती’ हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक बनलेला आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details