महाराष्ट्र

maharashtra

Chandrapur Crime : माजी नगरसेवकाच्या भंगार दुकानात जुगाराचा अड्डा; 17 आरोपींना अटक

By

Published : Jul 31, 2023, 10:38 PM IST

चंद्रपूर येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक करीमलाला काझी याच्या भंगाराच्या दुकानात जुगार खेळताना पोलिसांनी 17 जणांना अटक केली. ज्यात या नगरसेवकाचा देखील समावेश आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली. यात एकूण साडे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पडोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

Chandrapur Crime
17 आरोपींना अटक

चंद्रपूर: शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. पडोली परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार यांच्याकडून परवानगी आदेश प्राप्त करुन सापळा रचण्यात आला. पोलीस स्टेशन पडोली व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी संयुक्त कारवाई केली.

जुगाराचा खेळ चालू होता: पोलीस निरीक्षक एस. बी. कदम, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक कोंडावार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, कोसारा फाटा ते छोटा नागपूर मार्गावर काँग्रेसचे नगरसेवक करीमलाला याच्या भंगाराच्या दुकानात हा जुगार सुरू असल्याची खात्रीशीर महिती मिळाली. त्यानुसार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भंगाराच्या दुकानात पत्र्याचे छत असलेल्या बंद खोलीत भंगार दुकान मालक करीमलाला काझी हा काही इसमांना कट पत्यावर पैश्याची बाजी लावून खेळत असल्याचे निदर्शनास आले. हारजिकचा जुगार भरवून जुगाराचा खेळ खेळीत आहे. यात एकून १७ आरोपी ईसम कट पत्यावर पैश्याची बाजी लावून हारजिकचा खेळ खेळीत असतांनी मिळून आले. आरोपींची अंगझडतीत नगदी असे 37 हजार रूपये जप्त करण्यात आले.


इतका मुद्देमाल केला जप्त: त्यांच्याकडून एकूण 12 मोबाईल आणि 7 दुचाकी असा 5 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन पडोली येथे अप क्र २४३/२३ कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतीबंधक अधिनियम सहकलम १०९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

३१ जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई : याआधीही अशीच एक घटना घडली होती. धुळ्यात जुगार अड्ड्यावर नाशिकच्या आयजींच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी ३१ जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच ३० लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  2. Thane Crime : पैशाच्या वादातून शिंदे गटाच्या प्रमुखाची जुगार अड्ड्यावर निर्घृण हत्या, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  3. Chandrapur Crime : चंद्रपुरात कोळसा तस्करी रॅकेट पुन्हा सक्रिय? गोळीबारात भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, एकजण गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details