महाराष्ट्र

maharashtra

Chandrakant Khaire: चंद्रकांत खैरेंनी 22 आमदारांचे वक्तव्य घेतले मागे

By

Published : Nov 5, 2022, 10:48 PM IST

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी 22 आमदारांचे वक्तव्य मागे घेतले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात काँग्रेसचे 22 आमदार असून एकनाथ शिंदे गटातील आमदार बाद झाल्यानंतर त्यांचा फडणवीस वापर करतील असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले होते. (Chandrakant Khaire statement about 22 MLA).

औरंगाबाद:चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी 22 आमदारांचे वक्तव्य मागे घेतले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात काँग्रेसचे 22 आमदार असून एकनाथ शिंदे गटातील आमदार बाद झाल्यानंतर त्यांचा फडणवीस वापर करतील असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले होते. (Chandrakant Khaire statement about 22 MLA).

मात्र आता चंद्रकांत खैरे दिलगिरी व्यक्त करत माझ्यामुळे नाना पटोले यांचे मन दुखावले असल्याने माफी मागत महाविकास आघाडीतील संबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे.

सतेज पाटील यांनी केली होती मागणी:चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यानंतर माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खैरेंना हे वक्तव्या मागे घेण्याची मागणी केली होती. सतेज पाटील म्हणाले होते, "चंद्रकांत खैरे यांनी अनेक वर्ष खासदार म्हणून काम केले असून ते शिवसेनेचे मोठे नेते आहेत.

राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरे यांचे हे विधान संयुक्तिक नाही. सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत असून यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे सर्व सहभागी होत असताना असे वक्तव्य करून गैरसमज पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details