महाराष्ट्र

maharashtra

ACB Arrested Officer : जलसंधारण अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीकडून अटक

By

Published : Feb 6, 2023, 10:36 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात जलसंधारण अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागात हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. कामाची टक्केवारी म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

ACB Arrested Water Conservation Officer While Accepting a Bribe of Eight and Half Lakhs
जलसंधारण अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीकडून अटक

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने केलेल्या एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागातील अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजले जात आहे. जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई करीत एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आले आहे.


जलसंधारण अधिकाऱ्याची माहिती :जलसंधारण विभातील अधिकाऱ्याला पकडल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी, वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. मात्र, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.

एसीबीच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ :दरम्यान, एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. दरम्यान एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Kasba Bypoll : ...तरच भाजप आपला उमेदवार मागे घेईल; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान

ABOUT THE AUTHOR

...view details