महाराष्ट्र

maharashtra

Owner Arrested : लॉजची इमारत कोसळल्याचे प्रकरण; राजदीप बॅग हाऊसच्या मालकांना अटक

By

Published : Nov 1, 2022, 9:09 PM IST

राजेंद्र लॉजची अतिशिकस्त इमारत कोसळून (Rajendra Lodge building collapsed) मलम्याखाली दबल्याने पाच जणांचा मृत्यू झाला (five people died under building) तर दोघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी महापालिकेच्या उपअभियंत्याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री राजदीप बॅग हाऊसच्या दोन मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (case registered against owner of Rajdeep Bag House) दाखल केला होता. आज या दोघांना अटक ( Rajdeep Bag House owner arrested) करण्यात आली. Amravati Crime, latest news from Amravati

Rajdeep Bag House owner arrested
राजदीप बॅग हाऊसच्या मालकांना अटक

अमरावती :प्रभात चौकातील राजेंद्र लॉजची अतिशिकस्त इमारत कोसळून (Rajendra Lodge building collapsed) मलम्याखाली दबल्याने पाच जणांचा मृत्यू झाला (five people died under building) तर दोघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी महापालिकेच्या उपअभियंत्याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री राजदीप बॅग हाऊसच्या दोन मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (case registered against owner of Rajdeep Bag House) दाखल केला होता. आज या दोघांना अटक ( Rajdeep Bag House owner arrested) करण्यात आली. Amravati Crime, latest news from Amravati


दोन दिवसांची पोलीस कोठडी -हर्षल भरत शहा आणि एक महिला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना मंगळवारी दुपारी स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने हर्षल शहा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी तर महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली.


उपमुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार त्वरित कारवाई -महापालिकेच्या राजापेठ झोनचे उपअभियंता सुहास चव्हान यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री ८ च्या सुमारास शहांविरूध्द भादंविचे कलम ३०४अ, ३३८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. अतिशिकस्त इमारतीच्या मलम्याखाली दबून व्यवस्थापकासह चार मजुरांचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले. तर दुसरीकडे घटनेची भीषणता पाहता पोलिसांनी देखील तातडीने सुत्रे हलविली. हर्षल शहा हा अमरावतीत पोहोचताच त्याला सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. तर त्याच्यासोबतच्या सहमालक महिलेला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले.


अशी घडली होती घटना -प्रभात चौकातील राजेंद्र लॉज या जीर्ण इमारतीला पाडण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. त्यानुसार गत महिन्यात राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाडण्यात आले होते. मात्र, त्या जीर्ण इमारतीत तळमजल्यावर राजदीप एम्पोरियम बॅग हाऊस सुरू होते. तेथे रविवारी दुपारी दुरुस्तीच्या कामादरम्यान अचानक ती जीर्ण इमारत कोसळली. यामध्ये रिजवान शाह शरीफ शाह (२०, रा. उस्माननगर), मोहम्मद आरिफ शेख रहीम (३०, रा. रहेमतनगर), कमर इकबाल अब्दुल रफिक (३६, रा. रहेमतनगर), देवानंद हरिश्चंद वाटकर (४०, रा. महाजनपुरा) व रवी त्रिभूवन परमार (४०, रा. साईनगर) यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात राजेंद्र रामेश्वर कदम (४५) रा. आनंदनगर व एक महिला जखमी झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details