महाराष्ट्र

maharashtra

Runmochan Yatra in Amravati: अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन यात्रेला भाविकांची गर्दी; पौष महिन्यात भरते यात्रा

By

Published : Jan 9, 2023, 7:29 PM IST

पूर्णा नदीच्या काठावर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि भातकुली या दोन तालुक्यांसह अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या सीमेवर अनेक शतकांपासून पौष महिन्यात ऋणमोचन यात्रा (Runmochan Yatra in Amravati) भरते. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या यात्रेत पेढी नदीच्या काठावर असलेल्या मुद्दलेश्वर अर्थात महादेवाच्या दर्शनासाठी विदर्भातील (Vidarbha Runmochan Yatra) लाखो भाविकांची गर्दी (Devotees flock to Runmochan Yatra) उसळते.

Runmochan Yatra in Amravati
ऋणमोचन यात्रा, अमरावती

ऋणमोचन यात्रा, अमरावती

अमरावती :विदर्भातील ऋणमोचन (Vidarbha Runmochan Yatra) या स्थळाचे महत्त्व शेकडो वर्षांपासून सांगितले जाते. गणेश पुराणात ऋणमोचन च्या परिसरात मुद्गल ऋषीचा आश्रम होता. (Devotees flock to Runmochan Yatra) मुद्दल ऋषीच्या नावानेच या ठिकाणी असणाऱ्या महादेवाच्या पिंडीला मुदगलेश्वर असे नाव पडले आहे. श्रीकृष्णाने अमरावतीच्या श्री अंबादेवी मंदिरातून रुक्मिणीचे हरण केल्यावर ते सर्वांत आधी ऋणमोचन येथील मुदगलेश्वराच्या दर्शनासाठी थांबल्याचा उल्लेख देखील पुराणात आहे. ऋणमोचन येथील मुदगलेश्वराला (Mudgaleshwar Temple Amravati) रविवारचे महत्त्व आहे. त्यातही पौष महिन्यात मुगलेश्वराच्या दर्शनाला अधिक महत्त्व असून पौष महिन्यात मुदग्लेक्षराला जल अर्पण करण्यास विशेष असे महत्व प्राप्त आहे. पौष महिन्यात भरणाऱ्या ऋणमोचनच्या यात्रेला मुद्गलेश्वराला जल वाहण्यासाठी हजारो भाविक येतात. (Latest news from Amravati)

गाडगे महाराज यात्रेत व्हायचे सहभागी :कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी संसाराचा त्याग केल्यावर आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात ऋणमोचन यात्रेतून केली होती. 1905 मध्ये संत गाडगेबाबांनी ऋणमोचन यात्रेत येणाऱ्या भाविकांना पूर्णा नदी पार करून मुद्दलेश्वराच्या दर्शनाला जाताना होणारा त्रास पाहता नदीच्या काठावर पहिल्यांदा घाट बांधला. नदीच्या पलीकडे मुद्गलेश्वराचे मंदिर असताना संत गाडगेबाबांनी नदीच्या अलीकडे लक्ष्मीनारायण मंदिर उभारले. या यात्रेत येणाऱ्या दीनदुबळ्या आणि अनाथांना पोटभर अन्न मिळावे यासाठी 1907 च्या यात्रेदरम्यान डेबुजी अर्थात संत गाडगेबाबांनी अन्नछत्र सुरू केले. हे अन्नछत्र आज देखील या यात्रेत अविरतपणे सुरू असून पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी सुमारे 7 हजार दिन दुबळ्यांना अन्नदान, वस्त्रदान या यात्रेत केले जाते. गाडगेबाबा आपल्या हयातीत प्रमोशन यात्रेत पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी नित्य नेमाने सहभागी व्हायचे.


विदर्भातून अन्नदानासाठी मदत :कर्मयोगी संत गाडगेबाबांनी 1907 मध्ये ऋणमोचन येथे अन्नछत्राला सुरुवात केल्यानंतर ही परंपरा आज देखील कायम आहे. 2002 पर्यंत अच्युतराव देशमुख यांनी अन्नदानाची परंपरा सांभाळली. यानंतर मुंबई स्थित संत गाडगेबाबा मिशनचे सचिव बापूसाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने दरवर्षी रूमोचन यात्रेत अंध अपंग व निराधारांना अन्न ,वस्त्र वाटपाचे काम सुरू आहे. या ठिकाणी अमरावतीसह मुंबई ,पुणे, नाशिक, जळगाव , औरंगाबाद ,चंद्रपूर ,अकोला, दर्यापूर, नागपूर अशा अनेक ठिकाणावरून अन्नदात्यांचे सहकार्य लाभते. अमरावती अकोला दर्यापूर मुर्तीजापूर येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने ऋणमोचन यात्रेत अन्नदानासाठी मदत केली जात असल्याची माहिती ऋणमोचन येथील डेबूजी उर्फ गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.


रोडग्याच्या जेवणाला महत्त्व :ऋणमोचन यात्रेत रोडगे आणि बटाटे वांग्याच्या भाजीच्या जेवणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या ठिकाणी यात्रेदरम्यान दररोज 50 ते 60 ठिकाणी रोड यांच्या जेवणाचा कार्यक्रम असतो. प्रत्येक पाऊस रविवारी दीडशे ते झाडांचे रोडगे या यात्रेत होतात. मुदगलेश्वराच्या दर्शनासह रोडग्याच्या जेवणावर ताव मारण्यासाठी देखील मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी या यात्रेत उसळते.



नदी ओलांडण्याचा थरार:दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या कर्मवीर संत गाडगेबाबा यांनी उभारलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन घेतल्यावर भाविक पूर्णा नदी ओलांडून मुद्दलेश्वराच्या दर्शनासाठी जातात. नदी ओलांडणे सोपे व्हावे यासाठी या ठिकाणी मोठा दोर बांधण्यात आला आहे. दोर पकडून ही नदी ओलांडतानाचा थरार भाविक ऋणमोचन यात्रेत अनुभवतात.

ABOUT THE AUTHOR

...view details