महाराष्ट्र

maharashtra

Amravati Accident: विद्यार्थ्यांना घेऊन येणारा ट्रॅक्टर पलटला; 20 विद्यार्थी जखमी

By

Published : Feb 25, 2023, 11:27 AM IST

महाविद्यालयाचे २० विद्यार्थी शिबिर आटोपून परत येत असताना जैनपूर गावाच्या एक किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २० विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

Amravati Accident
ट्रॅक्टर पलटला

जैनपूर गावाच्या एक किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर पलटला

अमरावती: दर्यापूर जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराकरिता जैनपूर या गावी गेले होते. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तर पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

शिबीरात एकूण १०० विद्यार्थी:राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर दि. १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात एकूण १०० विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. या शिबिराची सांगता दि. २४ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. शिबिर संपल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थीनींना दर्यापूर येथे पोहचविण्याकरीता ट्रॅक्टर व इतर चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

रुग्णालयात पालकांची गर्दी: २० विद्यार्थी शिबिराचे सामान भरलेल्या ट्रॅकरमध्ये दर्यापूर येथे येण्याकरिता बसले होते. सदर वाहन जैनपूर पासून एक किलोमीटर पुढे आल्यावर अचानक ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. ट्रॅक्टरमध्ये बसलेले विद्यार्थी अपघातात जखमी झाले आहे. सदर वार्ता संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नातेवाईकानी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.




बेजबाबदारपणे विद्यार्थ्यांची वाहतूक: जैनपूर येथील शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसून आणण्यात आल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगू लागली. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाची कुठलीही काळजी न करता, शिबिरात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक केली. विशेष म्हणजे रा. से. यो शिबीराच्या आयोजनाकरिता महाविद्यालयीन फंडाची उपलब्धता असताना बेजबाबदारपणे विद्यार्थ्यांची वाहतूक ट्रॅकरच्या साह्यने केली. विशेष म्हणजे ट्रॅकरच्या साह्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणे नियमबाह्य आहे. सदर अपघातामुळे कॉलेज प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे.


विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर: सदर अपघात आकस्मिक घडला असून त्याचा धक्का आम्हालाही बसला आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजी म्हणून कॉलेज प्रशासनाने तातडीचा उपचार म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पीडीएमसी अमरावती येथे दाखल केले आहे. सद्यस्थितीत सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी दिली.तर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे हीसुशील जामनिक, अंकित दुधंडे , अमोल बोरखडे, श्याम मोटेकर, प्रशांत खरकटे, चेतन जवंजाळ, अमित बेले, प्रथमेश बुध, प्रशांत सरकटे, शुद्धोधन ढोले, अभिनाथ बोरखडे, विकी डोंगरे, चेतन पांडे, सतीश ढोले, अंकित दूधडे, यासह आणखी पाच विद्यार्थी त्यांची नावे रेकॉर्डला नाहीत.

हेही वाचा:Dharwad Accident धारवाडमध्ये भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details