ETV Bharat / bharat

Dharwad Accident : धारवाडमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Feb 24, 2023, 7:54 AM IST

कर्नाटकच्या धारवाड मध्ये ट्रक व कारच्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Dharwad Accident
धारवाड अपघात

धारवाड (कर्नाटक) : कर्नाटकच्या धारवाड तालुक्यातील तेगुरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 4 वर एका ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत.

पादचाऱ्याचाही जागीच मृत्यू : कारमध्ये प्रवास करणारे लोक बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील औराडी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. सैन्याच्या अग्निपथ भरती शिबिरात सहभागी होणार्‍या मित्राला निरोप देण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या कारने आधी लॉरीला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर तिने पुढे चालणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचाही जागीच मृत्यू झाला आहे. महांतेश मुद्दोजी (४०), बसवराज नारागुंडा (३५), नागप्पा मुद्दोजी (२९, रा. श्रीकुमार) आणि धारवाड हेब्बल्ली येथील पादचारी एरन्ना रामनगौदर (३५) अशी मृतांची नावे आहेत. एसपी लोकेश जगलासर यांनी सांगितले की, एका पादचाऱ्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.

जखमी रुग्णालयात दाखल : या घटनेत श्रावणकुमार नारागुंडा, मदिवलप्पा अल्नावरा, प्रकाश गौडा आणि मंजुनाथ मुद्दोजी हे चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी मंजुनाथ मुद्दोजी यांची अग्निपथमध्ये नियुक्ती झाली होती व ते त्यात सामील होणार होते. त्यांना हुबळी येथे सोडण्यासाठी बेळगावहून मित्र आणि नातेवाईक जात होते, यावेळी हा अपघात झाला. मंजुनाथला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एसपी लोकेश यांनी दिली आहे. गारगा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

मेरठमध्ये ट्रकने करला धडक दिली : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका ट्रकने कारला धडक दिली. धडकेच्या वेळी ट्रकचालक मद्य प्यायलेल्या अवस्थेत होता. घडकेनंतर पोलिसांनी ट्रक जप्त केला. मेरठच्या एका चौकातून कार चालक यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करताच अचानक पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. धडकेनंतर ट्रकने कारला सुमारे 3 किमीपर्यंत फरपटत नेले. त्यानंतर ट्रकचालकाने एका डंपरलाही धडक दिली. कारमध्ये चालकासह एकूण चार जण होते. आश्चर्याचे म्हणजे कारमधील सर्वांचा जीव सुखरुप असून त्यांनी अपघातानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा : Tiger Deaths In India : वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर, बिबट्यांच्या संख्येतही झपाट्याने घसरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.