महाराष्ट्र

maharashtra

Asian Games २०२३ : चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी, अंतिम सामन्यात जपानचा धुव्वा उडवला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 6:02 PM IST

Updated : Oct 6, 2023, 6:14 PM IST

Asian Games २०२३ : २०२३ आशियाई खेळात भारतीय पुरुष हॉकी संघानं उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. अंतिम सामन्यात भारतानं जपानचा ५-१ असा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय हॉकी संघ थेट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

hockey
hockey

हैदराबाद : Asian Games २०२३ : भारतीय पुरुष हॉकी संघानं २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघाचा अंतिम सामना जपानविरुद्ध होता. या सामन्यात भारतानं जपानचा ५-१ असा दारूण पराभव केला. या विजयासह भारतानं आशियाई स्पर्धेत आणखी एक सुवर्णपदक जिंकलं. भारताचं आजचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. यासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरला.

भारताचं २२ वे सुवर्णपदक : या सामन्यात भारतीय संघानं जपानच्या संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. सामन्यात भारतीय खेळाडूंनी एकापाठोपाठ एक गोल केले. अंतिम वेळेपर्यंत भारतीय संघानं ५ गोल केले होते, तर जपानी संघ फक्त १ गोल करू शकला. या विजयासह आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या २२ झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये २२ सुवर्ण पदकांसह भारताची एकूण पदकांची संख्या आता ९५ वर पोहोचली आहे.

या खेळाडूंनी गोल केले : अंतिम सामन्यात भारतानं जपानचा सहज पराभव केला. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला मनप्रीत सिंगनं भारतासाठी गोल केला. यानंतर अमित रोहिदासनं ३६ व्या मिनिटाला, कर्णधार हरमनप्रीत सिंगनं ३२ व्या मिनिटाला, अभिषेकनं ४८ व्या मिनिटाला आणि हरमनप्रीत सिंगनं ५९ व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. या सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट गोलमुळं भारतानं जपानचा ५-१ असा पराभव केला. या विजयानंतर सर्व खेळाडूंनी मैदानावर आनंदानं तिरंगा फडकवला.

भारताचे ५ गोल :मनप्रीत सिंगनं रिव्हर्स फटका मारत गोल करून भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर हरमनप्रीतनं पेनल्टी कॉर्नरच गोलमध्ये रूपांतर करत भारताची आघाडी वाढवली. अमित रोहिदासनं आणखी एका पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर केलं आणि भारताता ३-० अशी आघाडी मिळवून दिली. अभिषेकनं फायनल हूटरसाठी नऊ मिनिटे बाकी असताना भारतासाठी आणखी एक गोल केला. त्यानंतर जपानच्या तनाका सेरेननं एक गोल करत संघाची लाज राखली. मात्र हरमनप्रीतनं पाचवा गोल करत भारताचा विजय निश्चित केला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : 'राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत
  2. Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप २०२३ पूर्वी पाकिस्तानचे फक्त २ खेळाडू भारतात आले होते, जाणून घ्या त्यांची नावं
  3. Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन
Last Updated : Oct 6, 2023, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details