महाराष्ट्र

maharashtra

मेस्सीने अश्रू पुसलेल्या टिश्यू पेपरची किंमत ७.४३ कोटी रुपये, अश्रूचा होऊ शकतो क्लोन

By

Published : Aug 20, 2021, 3:36 PM IST

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं बार्सिलोना संघातून बाहेर जाण्याचा निर्णय एक पत्रकार परिषद घेऊन केला होता. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. त्यासाठी त्याने टिश्यू पेपर वापरला होता. त्याचा आता लिलाव होणार असून 7 कोटीहून अधिक किंमत या टिश्यू पेपरला मिळणार आहे.

Lionel Messi retires from Barcelona
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं बार्सिलोना संघातून बाहेर

अर्जेंटिनाचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं बार्सिलोना संघातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचे लाखो चाहते भावुक झाले होते. त्यानंतर ही घोषणा त्याने एक पत्रकार परिषद घेऊन केली. आजवर ज्या संघासाठी तो जीव ओतून खेळला तो संघ सोडताना त्याचे अश्रू अनावर झाले. भर पत्रकार परिषदेत तो मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर रडला. याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. त्यामुळे मेस्सीला भावुक झालेले पाहून त्याच्या चाहत्यांनाही गहिवरुन आले. मेस्सीने अश्रू पुसताना जो टिश्यू पेपर वापरला होता त्याचा आता लिलाव होणार आहे.

मेस्सीने वापरलेल्या टिश्यू पेपरची किंमत आता करोडो रुपये झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार मेस्सीच्या अश्रूंनी भरलेला हा टिश्यू पेपर सुमारे ७.४३ कोटी रुपयांना विकला जाणार आहे. या टिश्यूच्या विक्रीसाठी एक ऑनलाइन जाहिरातही देण्यात आली आहे.

मैकेडुयो नावाचा एक व्यक्ती मेस्सीच्या अश्रूंचा टिश्यू विकत घेणार असल्याचे समजते आहे. या अश्रूमध्ये मेस्सीचा जेनेटिक (अनुवंश) असल्याचे मानले जात आहे. त्यातून त्याचा क्लोनही तयार केला जाऊ शकतो अशा विश्वास त्याला आहे.

बार्सिलोनाकडून खेळताना लियोनेल मेस्सीने सर्वाधिक म्हणजे तब्बल ६७२ गोल केले आहेत. त्याने या क्लबकडून क्लबमधून 778 विक्रमी सामने खेळले आहेत. लियोनेल मेस्सीनं तब्बल 21 वर्षांनी सोडली बार्सिलोनाची साथ

मेस्सी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बार्सिलोनासोबत खेळत होता. मेस्सीचा बार्सिलोनासोबत असलेला करार 30 जून रोजी संपला. त्यानंतर आता मेस्सी दुसरा कोणताही क्लब जॉईन करु शकतो. आता मेस्सी बार्सिलोनाची साथ सोडली असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा - पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग जिंकणं माझं लक्ष्य आणि स्वप्न - लिओनेल मेस्सी

ABOUT THE AUTHOR

...view details