महाराष्ट्र

maharashtra

मिचेल स्टार्क ठरला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; जाणून घ्या आधीचे महागडे खेळाडू कोणते

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 3:49 PM IST

Updated : Dec 19, 2023, 4:16 PM IST

Mitchell Starc : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं आयपीएल लिलावात इतिहास रचला आहे. तो लिलावात विकला जाणारा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

मिचेल स्टार्क
मिचेल स्टार्क

दुबई Mitchell Starc : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव आज (१९ डिसेंबर) दुबईत झाला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतलं.

पॅट कमिन्सचा विक्रम एका तासात मोडला : इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादनं २०.५० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. अशा प्रकारे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र त्याचा हा विक्रम तासाभरातच मोडला. कमिन्सचा विक्रम त्याच्याच देशाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं मोडला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघानं २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतलं.

आता जाणून घ्या आयपीएलच्या इतिहासातील या आधीच्या महागड्या खेळाडूंबद्दल.

  1. पॅट कमिन्स (२०.५० कोटी रुपये) :आयपीएल २०२४ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादनं पॅट कमिन्सला २०.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. कमिन्सला विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार युद्ध रंगलं होतं. अखेर हैदराबादनं बाजी मारली.
  2. सॅम करन (१८.५० कोटी रुपये) : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा या आधी आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू होता. करननं आयपीएल २०२३ च्या लिलावात हा इतिहास रचला होता. या वेगवान अष्टपैलू खेळाडूला पंजाब किंग्ज (PBKS) फ्रँचायझीनं १८.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. सध्या तो पंजाब संघाचाच भाग आहे.
  3. कॅमेरून ग्रीन (१७.५० कोटी रुपये) :सॅम करननंतर कॅमेरून ग्रीन हा लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्सनं (MI) १७.५० कोटींची बोली लावून विकत घेतलं होतं. ग्रीन आगामी आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळताना दिसणार आहे. लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सनं त्याला ट्रेड केलं होतं.
  4. बेन स्टोक्स (१६.२५ कोटी रुपये) : इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्स (CSK) नं IPL 2023 च्या लिलावात १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र स्टोक्सनं वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आगामी आयपीएल हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  5. ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी रुपये) : दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस हा आयपीएल लिलावात विकला गेलेला चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सनं (RR) मॉरिसला १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
  6. निकोलस पूरन (१६ कोटी रुपये) : कॅरेबियन क्रिकेटर निकोलस पूरन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मागील आयपीएल लिलावात पूरनला लखनऊ सुपर जायंट्सनं (LSG) १६ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं. पूरण आगामी आयपीएल हंगामातही लखनऊ संघाकडूनच खेळताना दिसणार आहे.

सर्वात महागडे भारतीय खेळाडू :टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. युवराजला २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनं तब्बल १६ कोटींना विकत घेतलं होतं. मात्र, त्या मोसमात युवराज काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याला १४ सामन्यांत १९ च्या सरासरीने केवळ २४८ धावा करता आल्या.

टॉप ५ सर्वात महाग विकले जाणारे भारतीय खेळाडू :

  1. युवराज सिंग (१६ कोटी रुपये)
  2. ईशान किशन (१५.२५ कोटी रुपये)
  3. गौतम गंभीर (१४.९० कोटी रुपये)
  4. दीपक चहर (१४ कोटी रुपये)
  5. दिनेश कार्तिक (१२.५० कोटी रुपये)

हे वाचलंत का :

  1. पॅट कमिन्स ठरला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, डॅरेल मिशेल १४ कोटींमध्ये विकला
  2. लिलावात भारताच्या 'या' अनकॅप्ड खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली, जाणून घ्या त्यांची कामगिरी
Last Updated : Dec 19, 2023, 4:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details