ETV Bharat / sports

लिलावात भारताच्या 'या' अनकॅप्ड खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली, जाणून घ्या त्यांची कामगिरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 4:32 PM IST

IPL 2024
IPL 2024

IPL 2024 Auction : आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या लिलावात भारताच्या काही अनकॅप्ड युवा खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे.

नवी दिल्ली IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. या लिलावात भारतीय युवा अनकॅप्ड खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी एकूण ७० जागा रिक्त आहेत. त्यापैकी काही जागांवर या अनकॅप्ड खेळाडूंना संधी मिळू शकते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशाच काही अनकॅप्ड खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर या लिलावत धनाचा वर्षाव होऊ शकतो.

  1. मुशीर खान : आयपीएल लिलावात मुंबईच्या या अनकॅप्ड खेळाडूवर मोठी बोली लावली जाऊ शकते. मुशीर खान मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाजी आणि डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो सातत्यानं चमकदार कामगिरी करतोय. यामुळे यंदाच्या लिलावात या अनकॅप्ड खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील.
  2. अर्शिन कुलकर्णी : अर्शिन कुलकर्णी भारतातील अशा उदयोन्मुख युवा खेळाडूंपैकी एक आहे जो आपल्या खेळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. हा खेळाडू तुफान फलंदाजी करतो आणि चेंडूनं विकेटही घेतो. कुलकर्णीनं अलीकडेच सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत महाराष्ट्राकडून पदार्पण केलं. लिलावात या खेळाडूवर अनेक संघांची नजर असणार आहे.
  3. समीर रिजवी : या लिलावात मोठ्या बोली लागलेल्या अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समीर रिजवीचाही समावेश आहे. अलीकडेच, त्यानं यूपी टी २० लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले होते. हा २० वर्षांचा युवा फलंदाज त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. रिजवीच्या नावावर दोन अर्धशतकंही आहेत.
  4. कुमार कुशाग्र : कुमार कुशाग्रनं नुकतेच विजय हजारे करंडक स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवलं. झारखंडकडून खेळताना त्यानं महाराष्ट्राविरुद्ध ३७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं ६७ धावांची खेळी केली. या सामन्यात ३५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तो ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आता आयपीएलमधील अनेक फ्रँचायझी या अनकॅप्ड खेळाडूवर बोली लावू शकतात.

हे वाचलंत का :

  1. पांड्याचं 'हार्दिक' स्वागत करणं मुंबईला पडणार महागात? चाहत्यांसह संघातील अनेक खेळाडूही नाराज
  2. "तू कायमच आमचा कर्णधार राहशील", मुंबई इंडियन्सची रोहित शर्माला उद्देशून भावनिक पोस्ट
  3. मोठी बातमी! मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिकच्या खांद्यावर, रोहितच्या १० वर्षांच्या कारकिर्दीला विराम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.