महाराष्ट्र

maharashtra

आयपीएल : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने बदलले आपले नाव

By

Published : Feb 16, 2021, 7:39 AM IST

मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या पंजाब संघाला एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. पंजाबचा संघ एकदा उपविजेता राहिला होता. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठीचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत पार पडेल. २९२ खेळाडूंचे नशीब या लिलावातून समोर येणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब
किंग्ज इलेव्हन पंजाब

नवी दिल्ली - किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्यास (आयपीएल) पुढील सत्रात ते 'पंजाब किंग्ज' म्हणून ओळखले जातील. गेल्या हंगामात यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आठ आयपीएल संघांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा समावेश होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पंजाबचा संघ बर्‍याच काळापासून नाव बदलण्याचा विचार करीत आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी, याबाबत निर्णय घेणे योग्य होईल.

हेही वाचा -भारतासाठी दोन टी-२० सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती

मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या पंजाब संघाला एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. पंजाबचा संघ एकदा उपविजेता राहिला होता. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठीचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत पार पडेल. २९२ खेळाडूंचे नशीब या लिलावातून समोर येणार आहे.

पंजाबने कायम ठेवलेले आणि मुक्त केलेले खेळाडू -

नव्या पर्वात आयपीएलमधील सहभागी फ्रेंचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात पंजाबने त्यांच्या १६ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर ९ खेळाडूंना मुक्त केले आहे. त्यांनी कायम केलेल्या खेळाडूंमध्ये केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल यांचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉइन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौतम, तजिंदर सिंह.

ABOUT THE AUTHOR

...view details