महाराष्ट्र

maharashtra

टी 20 विश्वचषकांनतर भारतीय क्रिकेट संघ करणार श्रीलंकेचा दौरा; पाहा मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 9:16 AM IST

India To Tour Sri Lanka : भारतीय संघ 2024 मध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात त्यांना 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. जुलैमध्ये ही मालिका होणार आहे.

India to Tour Sri Lanka
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली India to Tour Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात त्यांना 6 सामने खेळायचे आहेत. यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. ही मालिका टी 20 विश्वचषक 2024 नंतर जुलैमध्ये खेळवली जाईल. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या मालिकेची घोषणा केलीय.

कोणते संघ करणार श्रीलंकेचा दौरा : 2024 च्या भावी दौऱ्याचा कार्यक्रम श्रीलंकेनं जाहीर केलाय. यात भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेचाही समावेश आहे. झिम्बाब्वे संघ हा श्रीलंकेच्या भावी दौर्‍याच्या कार्यक्रमात पहिला संघ आहे. झिम्बाब्वेचा संघ जानेवारी 2024 मध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये बांगलादेशचा संघ श्रीलंकेत येईल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहेत. यानंतर 2024 टी-20 विश्वचषक जून आणि जुलैमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर जुलैमध्येच श्रीलंका संघ भारताविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यापुढं न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहेत. न्यूझीलंड दोन वेळा श्रीलंकेचा दौरा करणार आहे.

श्रीलंकेनं 2023 मध्ये केला होता भारत दौरा : श्रीलंकेनं 2023 मध्ये भारताचा दौरा केला होता. तेव्हा दोघांमध्ये तीन टी 20 आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळले गेले. भारतीय संघानं दोन्ही मालिका जिंकल्या होत्या. टी-20 मालिकेत भारतानं श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला. भारतानं टी-20 मालिकेतील पहिला सामना 2 धावांनी जिंकला, त्यानंतर श्रीलंकेनं दुसरा सामना 16 धावांनी जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतानं 91 धावांनी विजय मिळवत मालिकेवर आपलं नाव कोरलं होतं. यानंतर, एकदिवसीय मालिकेत भारतानं पहिला सामना 67 धावांनी, दुसरा 4 गडी राखून आणि तिसरा सामना 317 धावांनी जिंकून मालिका जिंकली होती.

हेही वाचा :

  1. वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय, फॅन्सची धाकधूक वाढली
  2. राहुल द्रविडच राहणार टीम इंडियाचा हेड कोच, व्हीव्हीएस लक्ष्मणकडे 'ही' जबाबदारी
  3. Ind Vs Aus T20 : मॅक्सवेलचा दणका, ऑस्ट्रेलियाचा भारतावर ५ गडी राखून विजय; ऋतुराजचं शतक व्यर्थ

ABOUT THE AUTHOR

...view details