महाराष्ट्र

maharashtra

Hardik Pandya Injury : दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या संघात कधी परतणार? फिटनेसबाबत मोठं अपडेट जाणून घ्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 8:41 PM IST

Hardik Pandya Injury : टीम इंडियाचा हुकमी खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो गेल्या २ सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. आता त्याच्या फिटनेसबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर..

Hardik Pandya
Hardik Pandya

नवी दिल्ली Hardik Pandya Injury : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे चालू विश्वचषकात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांतून बाहेर होऊ शकतो. पुण्यात बांग्लादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात हार्दिकचा उजवा घोटा मुरगळल्यानं त्याला अर्ध्यातूनच मैदान सोडावं लागलं होतं.

पुढील दोन सामन्यातून बाहेर : यानंतर हार्दिक पांड्याला पुनर्वसनासाठी बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नेण्यात आलं. तेथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या आधी हा अष्टपैलू खेळाडू २९ ऑक्टोबरला लखनऊ येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी थेट संघात सामील होईल अशी अपेक्षा होती. परंतु लिगामेंटच्या दुखापतीमुळं त्याला त्या सामन्यातूनही बाहेर बसावं लागलं. रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की, भारतीय संघाची वैद्यकीय टीम एनसीएच्या सतत संपर्कात आहे. येत्या काही दिवसांत हार्दिकच्या फिटनेसबाबत आणखी अपडेट अपेक्षित आहेत. मात्र श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही.

हार्दिकची अनुपस्थिती जाणवली नाही : संघातील हार्दिक पांड्याची अनुपस्थिती मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांनी भरून काढली. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर शमीनं आतापर्यंत विश्वचषकातील केवळ दोन सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात सूर्यकुमार २ धावा काढून बाद झाला होता. मात्र त्यानं इंग्लंडविरुद्ध ४७ चेंडूत ४९ धावांची लढाऊ खेळी खेळून पुनरागमन केलं.

भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी : या विश्वचषक स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. खेळलेल्या सहा पैकी सहा सामन्यांत विजय मिळवून टीम इंडिया स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी कोलकात्याला जाण्यापूर्वी भारताला गुरुवारी मुंबईत श्रीलंकेविरुद्ध खेळायचं आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत, जाणून घ्या सर्व संघांचं गणित काय
  2. Sachin Tendulkar Statue : क्रिकेटचा देव वानखेडेवर अवतरला, सचिनच्या २२ फूट उंच पुतळ्याचं अनावरण
  3. Cricket World Cup 2023 : पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्या दरम्यान ईडन गार्डन्सवर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा; चार जण ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details