ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्या दरम्यान ईडन गार्डन्सवर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा; चार जण ताब्यात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 12:42 PM IST

Cricket World Cup 2023 : कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषक क्रिकेट सामना रंगला. यावेळी स्टेडियममध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

कोलकाता Cricket World Cup 2023 : जगप्रसिद्ध ईडन गार्डन्स स्टेडियमवर मंगळवारी क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगला. यावेळी स्टेडियममध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले होते. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, चौकशीनंतर सर्वांना सोडून देण्यात आलंय.

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा : सामन्या दरम्यान चार पॅलेस्टाईन समर्थक स्टेडियममध्ये दिसले. त्यांनी देशाच्या समर्थनार्थ पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावले. तसंच यावेळी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाही ऐकू आल्या. या संपूर्ण घटनेनं जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण असलेल्या स्टेडियममध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. याप्रकरणी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्यांच्या वागण्याचा उद्देश तपासण्यात आला. त्यांची चौकशी करून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती कोलकाता पोलिस डीसी (दक्षिण) प्रियब्रत रॉय यांनी दिलीय.

मैदानात पाकिस्तानी जोडपंही उपस्थित : दरम्यान, काही पाकिस्तानी चाहतेही स्टेडियममध्ये दिसले. त्यांच्यामध्ये एक जोडपं होतं. जैन झीवानजी आणि फरजाना झीवानजी असं या जोडप्याचं नाव आहे. मूळचे कराचीचं असलेलं हे जोडपं मागील अनेक दिवसांपासून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं वास्तव्यास आहे. हे उद्योगपती जोडपं 2003 पासून सर्व क्रिकेट विश्वचषक, T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा जयजयकार करत आहेत. 2003 मध्ये सचिन तेंडुलकरची ऐतिहासिक खेळी किंवा चार वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये महेंद्रसिंग धोनीची धावबाद होण्याचा ते साक्षीदार आहेत. मात्र, पाकिस्तानला विश्वचषक जिंकता न आल्याची त्यांना मोठी खंत आहे. यावेळीही पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा फार कमी आहेत. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर, या विश्वचषकातील उर्वरित तीन सामने जिंकून आपला देश कसा तरी उपांत्य फेरी गाठेल, अशी या पाकिस्तानी जोडीला आशा आहे.

पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशचा 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय. यामुळं त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. मात्र असं असलं तरी पाकिस्तनला उपांत्या फेरी गाठण्यासाठी उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसंच इतर सामन्यांचे निकालही त्यांच्या बाजूनं लागण्याची प्रार्थना करावी लागणार आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : पाकिस्तानचा बांग्लादेशवर मोठा विजय, उपांत्य फेरीच्या आशा कायम
  2. Cricket World Cup 2023 NZ vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.