महाराष्ट्र

maharashtra

Cricket World Cup 2023 BAN vs SL : प्रतिष्ठेसाठी श्रीलंका-बांगलादेश खेळणार; मात्र 'या' कारणामुळं रद्द होऊ शकतो सामना

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 11:59 AM IST

Cricket World Cup 2023 BAN vs SL : आज नवी दिल्लीत श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकातील 38 वा सामना रंगणार आहे. या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बांगलादेश अधिकृतपणे बाहेर पडला आहे. तर श्रीलंकेसाठी काही आशा शिल्लक आहेत. मात्र दिल्लीतील वायूप्रदूषणामुळं आजच्या सामन्यावर अनिश्चिततेचे ढग कायम आहेत.

Cricket World Cup 2023 BAN vs SL
Cricket World Cup 2023 BAN vs SL

नवी दिल्ली Cricket World Cup 2023 BAN vs SL : विश्वचषकाचा 38 वा सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. इंग्लंड आणि बांगलादेश अधिकृतपणे विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी श्रीलंकेला फार कमी आशा आहेत. पण त्यांचं उपांत्य फेरीतीलं स्थान इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. दोन्ही संघ आता आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

दोन्ही संघांची निराशजनक कामगिरी : शाकीब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशनं सलग सहा सामने गमावले आहेत. या विश्वचषकात त्यांना एकच सामना जिंकता आलाय. गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. पाकिस्ताननं मागील सामन्यात बांगलादेशचा 7 विकेट्सनं पराभव केला होता. त्यामुळं ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर दुसरीकडे, श्रीलंकेचा प्रथम अफगाणिस्तानविरुद्ध आणि नंतर भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव झालाय. त्यांच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळं त्यांना भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

सामन्यावर प्रदूषणाचे ढग : राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायूप्रदूषणामुळं श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषकातील आजच्या सामन्यावर अनिश्चिततेचे ढग असून खेळाडूंच्या आरोग्याला किंवा सामन्याला प्राधान्य दिलं जातं की नाही हे पाहणं बाकी आहे. विषारी धुक्यानं राष्ट्रीय राजधानीला वेढलंय. यामुळं दोन्ही संघांना किमान एकदा त्यांचे सराव सत्र रद्द करावे लागले, कारण वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) गंभीर श्रेणीत आहे.

खेळपट्टी कशी असेल : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी सहसा फलंदाजीसाठी फायदेशीर असते. या खेळपट्टीवर फलंदाजांना चौकार मारणं सोपं जातं. कारण खेळपट्टी कोरडी आहे आणि सीमारेषा लहान आहेत. जसजसा सामना पुढे जाईल तसतशी फिरकीपटूंना मदत मिळेल. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करणे पसंत करतो.

हेड टू हेड रेकॉर्ड कसा :बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 53 सामने खेळले गेले आहेत. ज्यात श्रीलंकेचा वरचष्मा दिसतोय. श्रीलंकेनं 42 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला केवळ 9 सामने जिंकता आले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

बांगलादेश : तन्झीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), महमुदुल्लाह, शकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम

श्रीलंका : पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार, यष्टिरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महिश थीक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

हेही वाचा :

  1. Virat Kohli Equals Sachin Record : 'देवाशी' बरोबरी केल्यानंतर विराट भावूक होत म्हणाला, 'हा खूप मोठा सन्मान'
  2. Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं केला आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम, अवघ्या ८३ धावांत गुंडाळलं!
  3. Virat Kohli Record : कोहलीची विश्वचषकात आणखी एक 'विराट' कामगिरी; रचला नवा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details