महाराष्ट्र

maharashtra

सुश्मिताचा एक्स विक्रम भट्ट म्हणाला, 'ती गोल्ड नाही लव्ह डिगर आहे'

By

Published : Jul 19, 2022, 10:41 AM IST

सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड विक्रम भट्ट याने सुष्मिता सेनचे संपूर्ण व्यक्तीमत्व लोकांसमोर ठेवले आहे. विक्रमने सुष्मितासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. ती कधीच स्वार्थाने वागत नाही याबद्दल उदाहरणासह स्पष्टीकरण त्याने दिलंय.

सुश्मिताचा एक्स विक्रम भट्ट
सुश्मिताचा एक्स विक्रम भट्ट

मुंबई - आयपीएलचे संस्थापक ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याबाबत चर्चेचा बाजार सध्या चांगलाच तापला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीला गोल्ड डिगर म्हटले जात आहे, ज्याला अभिनेत्रीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता सुष्मिता सेनचा माजी प्रियकर आणि चित्रपट निर्माता विक्रम भट्ट तिच्या समर्थनार्थ आला आहे. सुष्मिता सेन ही गोल्ड डिगर नाही हे सिद्ध करण्याचा विक्रमने पुरेपूर प्रयत्न केला आहे. एका मुलाखतीत विक्रम भट्ट यांना ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिली.

एक्स गर्लफ्रेंड सुष्मिता सेनला गोल्ड डिगरला म्हणत असल्याबद्दल विक्रम भट्ट म्हणाले, 'सुष्मिता एक लव्ह डिगर आहे, गोल्ड डिगर नाही. मला वाटते की इतरांच्या आयुष्याची चेष्टा करणे हे मनोरंजन बनले आहे, एखाद्याची शोकांतिका म्हणजे एखाद्यासाठी मनोरंजन बनले आहे'.

विक्रम पुढे म्हणाला, ''येथे नेहमीच असे घडते, जेव्हा करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केले तेव्हा तिला ट्रोल देखील केले गेले होते. त्यामुळे मला वाटते की हे सर्व क्षेत्रानुसार आहे आणि जर तुम्ही सेलिब्रिटी असाल आणि जर तुमचा असा एकादा निर्णय इंटरनेट युजर्सना चेष्टास्पद वाटू लागला तर ते ट्रोलिंग करायला सुरूवात करतात.''

विक्रमने सांगितली एक गोष्ट - मीडिया रिपोर्टनुसार विक्रमने सांगितले आहे की सुष्मिता ही एक वेगळ्या प्रकारची मुलगी आहे, ती कोणाशीही संबंध ठेवण्यासाठी तिचा बँक बॅलन्स तपासत नाही. विक्रमने त्याच्या अनुभवांच्या आधारे या गोष्टी सांगितल्या आहेत.

विक्रम म्हणाला, ''मी कंगला होतो आणि 'गुलाम' चित्रपट बनवत होतो, पण पैशांची कमतरता होती. त्यावेळी सुश्मिता मला अमेरिकेला घेऊन गेली, तिनेच माझा सर्व खर्चाचा भार उचलला. तिथे लॉस एंजेलिसमध्ये आमच्यासाठी एक लिमोजिन कार व्यवस्थेला होती. कारण माझी अमेरिकेत एन्ट्री खास बनली पाहिजे असे सुश्मिताला वाटत होते.''

सुष्मिताने तिला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना फटकारले - इथे रविवारी सुष्मिता सेननेही तिला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. अभिनेत्रीने लिहिले, 'ते मित्र, जे माझे कधीच नव्हते आणि ज्यांना मी कधीच भेटले नव्हते, ते सर्वजण माझ्या आयुष्यावर आणि चारित्र्याबद्दल सखोल ज्ञान देण्यातगुंतले आहेत, ते मला सोने खोदणारी म्हणवून स्वतः कमाई करीत आहेत, ते किती प्रतिभावान आहेत. मी सोन्यापेक्षाही जास्त खोल खणून काढते आणि नेहमी हिऱ्यांना प्राधान्य देते आणि होय, मी ते स्वतः विकत घेते.'

कधी होते विक्रम-सुष्मिताचे अफेअर - 1996 मध्ये विक्रम भट्ट आणि सुष्मिता सेनच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. वास्तविक, दोघेही 'दस्तक' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते आणि येथून जवळ आले होते. सुष्मिताचा हा डेब्यू चित्रपट होता. विक्रम वयाने सुष्मितापेक्षा 7 वर्षांनी मोठा होता आणि या चित्रपटाचा लेखक होता. तसेच त्याचे लग्न झाले होते. त्याचवेळी या नात्यामुळे विक्रमच्या वैवाहिक जीवनात वादळ निर्माण झाले होते.

हेही वाचा -Bhupinder singh passes away : 'नाम गुम जायेगा' गायक भूपिंदर सिंह यांचे ८२ व्या वर्षी निधन; अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details