ETV Bharat / city

Bhupinder singh passes away :अभिनेता आणि चाहत्याकडून गायक भूपिंदर सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली

author img

By

Published : Jul 19, 2022, 6:10 AM IST

Updated : Jul 19, 2022, 12:50 PM IST

१९६२ मध्ये दिग्गज संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी त्यांना गाताना ऐकले आणि मुंबईत बोलावले व ‘हकीकत’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. “नाम गुम जायेगा”, “दो दिवाने शहर में”, “आने से उसके आयी बहार”, “करोगे याद तो”, “मीठे बोल बोले”, “एक अकेला इस शहर में”, मोहम्मद रफी, तलत मेहमूद, मान्ना डे यांच्या सोबत गायलेले “होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा” ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत

गायक भूपिंदर सिंग
गायक भूपिंदर सिंग

मुंबई- पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेले आणि १९५० च्या दशकात ऑल इंडिया रेडिओवरून कारकिर्दीची सुरुवात करणारे भूपिंदर सिंह यांचे वयाच्या ८२व्या वर्षी देहावसान झाले. त्यांची पत्नी मिताली यांनी माध्यमांना याबाबतीत कळविले. त्यांना किडनी संबंधित आजार होता आणि इतरही व्याधी असल्यामुळे त्यांचे निधन झाले. भूपिंदर सिंह यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वयाच्या ८२ व्या वर्षी गायक भूपिंदर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी मिताली सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की "त्यांना काही काळापासून लघवीच्या समस्यांसह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रास होत होता. तपासादरम्यान त्यांना कोलन कॅन्सर झाला असल्याचा संशय होता. स्कॅनिंगमध्ये कॅन्सरची शक्यता दिसली होती. त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती.

भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • महाराष्ट्र: मशहूर गायक भूपिंदर सिंह का पार्थिव शरीर अंतिम संस्कार के लिए मुंबई के श्मशान घाट लाया गया।

    भूपिंदर सिंह लंबे समय से बीमार चल रहे थे। उनकी पत्नी मिताली सिंह का कहना है कि वह पिछले 9 दिनों से अस्पताल में भर्ती थे और दिल का दौरा पड़ने से उनका निधन हो गया। pic.twitter.com/GA2KljcuZd

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला - प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल, असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले आहे.

  • प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला - ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. आपल्या आवाजाने आम्हाला अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.संगीत क्षेत्रातील आपले योगदान कायम स्मरणात राहणार आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना. विनम्र श्रद्धांजलि, असेही उपमुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले आहे.

  • Sad to hear about demise of veteran playback singer Bhupinder Singh ji.
    With his gifted voice he gave us many memorable songs.
    His contribution in the field of music will be remembered forever.
    My deepest condolences to his family, friends & fans.
    विनम्र श्रद्धांजलि
    ॐ शान्ति 🙏

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शोक व्यक्त केला - दिग्गज गायक भूपिंदर सिंह राहिले नाहीत, हे जाणून खरच दु:ख झाले आहे. आपल्या अनोख्या मधुर आवाजाने आणि मनमोहक गाण्यांनी त्यांनी चित्रपट तसेच संगीत क्षेत्रात आपली छाप सोडली. मी त्यांचा वर्षानुवर्षे चाहता आहे. "दिल धुंदता है" हे गाणे नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे.

नाना पटोले यांनी शोक संदेशात लिहीले - करोगे याद तो, हर बात याद आयेगी, गुज़रते वक़्त की, हर मौज ठहर जायेगी ! प्रसिद्ध गझल गायक भूपेंद्र सिंह यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नेते नाना पटोले यांनी शोक संदेशात लिहीले आहे.

गायक भूपिंदर सिंग

अजय देवगण यांनी शोक संदेशात लिहीले - भूपिंदर जी यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले. त्याच्या आवाजाने लाखो लोकांना आनंद दिला आणि एक वेगळेपण होते. असे अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते अजय देवगण यांनी शोक संदेशात लिहीले आहे.

  • Deeply saddened about the demise of Bhupinder ji. His voice brought joy to millions and had an uniqueness.
    Condolences to his family. RIP Bhupinder Ji. 🕉 Shanti 🙏 pic.twitter.com/IAvtJf0ZF8

    — Ajay Devgn (@ajaydevgn) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ही गाणी होती प्रसिद्ध- १९६२ मध्ये दिग्गज संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी त्यांना गाताना ऐकले आणि मुंबईत बोलावले व ‘हकीकत’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. “नाम गुम जायेगा”, “दो दिवाने शहर में”, “आने से उसके आयी बहार”, “करोगे याद तो”, “मीठे बोल बोले”, “एक अकेला इस शहर में”, मोहम्मद रफी, तलत मेहमूद, मान्ना डे यांच्या सोबत गायलेले “होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा” ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत. “दुक्की पे दुक्की हो या हो सत्ता पे सत्ता” सारखे उडत्या चालीचे गाणेही त्यांच्या नावावर आहे. भूपिंदर सिंह यांनी अनेक प्रसिद्ध संगीतकारांसाठी पार्श्वगायन केले आहे ज्यात “दुनिया छुटे, यार ना छुटे”, “बीती ना बितायी रैना”, “हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए”, “कभी किसीको मुकम्मल जहाँ नहीं मिलता”, “जिंदगी मेरे घर आना” या गाण्यांचा समावेश आहे. तसेच ते इतर भारतीय भाषांमध्येसुद्धा गायले असून गाण्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक गाण्यांसाठी गिटार आणि व्हायोलिन देखील वाजवले आहे. प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील आणि संगीतक्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबाला शोकसंदेश पाठविले आहेत.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते व्यक्त केले शोकसंवेदना- प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात. भूपिंदर सिंह हे प्रामुख्याने गझल गायकीसाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक चित्रपटांतून पार्श्वगायन केलेले आहे. “मौसम”, “सत्ते पे सत्ता”, “आहिस्ता आहिस्ता”, “दूरियां”, “हकीकत” आणि अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी त्यांना लक्षात ठेवले जाईल. “कभी किसी को मुकम्मल”, “किसी नजर को तेरा इंतेझार आज भी है” आणि “दिल धुंडता है” यांसारख्या सदाबहार गाण्यांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांनी त्यांचे वडील नाथा सिंहजी, जे एक सुप्रसिद्ध गायक होते, यांच्याकडून सांगीतिक प्रशिक्षण घेतले होते. भूपिंदर यांनी तरुणपणातच गिटार आणि व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली होती. भूपिंदर सिंह हे काही वर्ष दिल्ली दूरदर्शनशीही संलग्न होते.

हेही वाचा - CM Eknath Shinde In Delhi : आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत गौप्यस्फोट

Last Updated : Jul 19, 2022, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.