महाराष्ट्र

maharashtra

'मेरी ख्रिसमस'ची कास्ट झाल्यानंतर कतरिना कैफनं केलं होतं विजय सेतुपतीला गुगल सर्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 5:39 PM IST

Merry Chtistmas : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. सध्या कतरिना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Merry Chtistmas
मेरी ख्रिसमस

मुंबई - Merry Chtistmas :अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कतरिनासोबत साऊथ स्टार विजय सेतुपती हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची वाट अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या कतरिना कैफ आणि विजय सेतुपती त्यांच्या या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान कतरिनानं एका मुलाखतीत विजय सेतुपतीबद्दल एक खुलासा करत सांगितलं की , तिनं '83' या चित्रपटात विजय सेतुपतीला पाहिले होतं. नंतर विजय आणि श्रीराम राघवन यांनी संवादाला थांबत कतरिना दुरुस्त करत म्हटलं की, ''हा चित्रपट '83' नसून '96' आहे.'' यानंतर लगेच कतरिनानं माफी मागितली.

कतरिनानं विजयला गुगलवर सर्च केलं : कतरिनानं पुढं म्हटलं, ''होय मी विजय सेतुपतीला '96' या चित्रपटात पाहिलं होतं आणि मला हा चित्रपट खूप आवडला होता.'' 'मेरी ख्रिसमस'ची कास्टिंग झाल्यानंतर कतरिनानं विजयला गुगलवर सर्च केलं होतं. यानंतर तिला त्याचा फोटो राखाडी केसांचा दिसला. पण त्याचा हा फोटो तिला आवडला असं तिनं म्हटलं. यानंतर कतरिनानं या चित्रपटातील विजय आणि त्रिशाच्या केमिस्ट्रीचे कौतुक केलं. याशिवाय तिनं या मुलाखती दरम्यान चित्रपटातील दृश्ये अप्रतिम असल्याचं सांगितलं. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती व्यतिरिक्त राधिका आपटे, विनय पाठक , संजय कपूर, टीनू आनंद, अदिती गोवित्रीकर, अश्विनी काळसेकर, प्रतिमा कणनं असे काही कलाकार आहेत.

कतरिना विजयचा स्टारर 'मेरी ख्रिसमस' होणार प्रदर्शित : 'मेरी ख्रिसमसबद्दल बोलायचं झालं तर कतरिना कैफ आणि विजय सेतुपती या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात विजय नकारात्मक भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची कहाणी जरा हटके असेल. कतरिना आणि विजयला त्यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा आहे. या चित्रपटामध्ये कतरिना ही अनोख्या अंदाजात दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आयरा खाननं भाऊ जुनैद खानसोबत शेअर केला फोटो
  2. जयपूर पिंक पँथर्सला चिअर करण्यासाठी पोहचले बच्चन कुटुंब
  3. करण सिंग ग्रोव्हरनं बिपाशा बसूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेअर केली पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details