महाराष्ट्र

maharashtra

'बिग बॉस 17'मध्ये खानजादीच्या मेंटल हेल्थवर 'जवान' अभिनेत्री रिद्धी डोगरानं केली पोस्ट शेअर

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 10:45 AM IST

Bigg Boss 17: खानजादीच्या मेंटल हेल्थवर अभिनेत्री रिद्धी डोगरानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं खानजादीबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

Bigg Boss 17
बिग बॉस 17

मुंबई - Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये खानजादीच्या तब्येतीचा मुद्दा सतत चर्चेत आहे. गेल्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये तिला सलमान खाननं तिच्या तब्येतीबद्दल घरी सतत बोलल्याबद्दल फटकारलं होतं. यानंतर खानजादीनं या एपिसोडमध्ये रडत बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. यावेळी खानजादी खूप अस्वस्थ होती. याशिवाय यावेळी ती घर सोडायलाही तयार होती. यानंतर खानजादी 'बिग बॉस'च्या घरात सतत अडचणीत दिसली. ती सतत स्वतःला इतरांपासून दूर ठेवताना दिसली. खानजादीनं गेल्या 'वीकेंड का वार'मध्ये अभिषेक कुमारशीही चर्चा केली होती. जिथे ती अभिषेक कुमारसोबतच्या टास्कदरम्यान झालेल्या गोष्टींबद्दल स्पष्टीकरण विचारताना दिसली.

रिद्धी डोगरानं शेअर केली पोस्ट : यानंतर अभिषेक कुमारनेही माफी मागितली. दरम्यान टीव्ही सीरियल आणि बॉलीवूड अभिनेत्री रिद्धी डोगरानं खानजादीच्या या अवस्थेबद्दल उघडपणे सांगितलं आहे. तिनं 'एक्स'वर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, 'जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी फेक दाखवत आहे. कृपया मेंटल हेल्थ तज्ज्ञांना येऊ द्या. तिला कशाचा तरी त्रास होत आहे. याबद्दल तिला आणि तिच्या डॉक्टरला नक्की समजेल. मी काल कलर्स टीव्हीची क्लिप पाहिली , ज्यावरून असे वाटले की ती व्यक्ती कशाशी तरी लढत आहे'.खानजादीच्या समर्थनार्थ रिद्धी डोगरा आता समोर आली आहे.

रिद्धी डोगराच्या पोस्टवर आल्या कमेंट :रिद्धी डोगराच्या या पोस्टवर एका यूजरनं लिहिले की, 'हा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद.' दुसऱ्यानं यूजरनं कमेंट करत लिहिलं की, 'होय, तिला काहीतरी त्रास होत आहे. कलर्स टीव्हीनं याचा गांभीर्याने विचार करायला हवा'. घर सोडण्याच्या खानजादीच्या सततच्या मागणीमुळं, निर्मात्यांनी गेल्या आठवड्यात तिला थेट नॉमिनेट केलं होतं. या कारणास्तव, खानजादी या आठवड्यात नॉमिनेट यादीत आहे. मात्र, या 'वीकेंड का वार' स्पेशल एपिसोडमध्ये तिच्यावर खरोखरच टांगती तलवार राहणार आहे. या 'वीकेंड का वार'मध्ये खानजादी खरोखरचं घराबाहेर निघेल का? हे पाहणं लक्षणीय असणार आहे.

हेही वाचा :

  1. दयाबेन 'तारक मेहतात' परतली, जेटालाल कुटुंबात उत्साहाचं वातावरण
  2. 'ऋषीजी इथं हवे होते', रणबीरचा 'अ‍ॅनिमल' पाहिल्यानंतर नीतू कपूरनं व्यक्त केली भावना
  3. करण जोहरनं केली विकी जैनची पोलखोल, अभिषेक कुमारचीही घेतली शाळा

ABOUT THE AUTHOR

...view details