ETV Bharat / entertainment

करण जोहरनं केली विकी जैनची पोलखोल, अभिषेक कुमारचीही घेतली शाळा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 4:41 PM IST

Karan Johar hosts Weekend Ka Vaar : बिग बॉस 17 चा आगामी वीकेंड का वारचा एपिसोड नाट्यमय असणार आहे. करण जोहर होस्ट करत असलेल्या या भागात तो अनेक स्पर्धकांची शाळा घेताना दिसत आहे. यात त्यानं विकी जैन आणि अभिषेक कुमारला चांगलंच झापलंय.

Karan Johar hosts Weekend Ka Vaar
करण जोहरनं केली विकी जैनची पोलखोल

मुंबई - Karan Johar hosts Weekend Ka Vaar : वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 17 चा आगामी एपिसोड नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. या विकेंडला शोचे होस्ट म्हणून करण जोहर येणार आहे. शोच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला नवीन प्रोमो व्हिडिओ इव्हेंटफुल 'वीकेंड का वार' एपिसोडची झलक दाखवणारा आहे. करणने स्पर्धकांना त्यांच्या बिग बॉस घराच्या हद्दीतील वागणुकीबद्दल विचारलं. करणनं स्पर्धकांची शाळा घेतली. या स्पर्धकांमध्ये अभिषेक कुमार आणि विकी जैन यांचाही समावेश होता.

वीकेंडच्या होस्ट असलेल्या करणनं विकी जैनच्या डावपेचांचा पर्दाफाश केला आणि त्याचा एकमात्र हेतू स्वतःच्या फायद्यासाठी 'नंबर गेम' खेळण्याचा असल्याचं सांगितलं. त्यानं निदर्शनास आणून दिले की विकी जैन केवळ त्याच्या जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी मैत्री ठेवतो. त्यानंतर करण अंकिताकडे वळला आणि तिला याबद्दल विचारले, विकीचे दावे खरे आहेत की नाही याची चौकशी केली. या खुलाशाने इतर स्पर्धकांना थक्क करून अंकितानं करणशी सहमती दर्शवली.

करणनं अंकिताला विचारलं, "अंकिता प्लीज मला सांग, विकीनं तुला किती वेळा सांगितलंय की, जर तुझ्या ग्रुपमध्ये जास्त लोक असतील तर तुला अंतिम ध्येय गाठण्याची चांगली संधी मिळेल?" यावर अंकितानं उत्तर दिलं, "हो सर, त्याने मला हे अनेकदा सांगितलंय." नंतर करणने ठामपणे सांगितले की, "विकी, जर तुला इतरांना फसवायचे असेल आणि नंबर गेम खेळायचा असेल, तर असे धाडसी आणि सरळ पद्धतीनं कर आणि असं खेळू नको."

दुसर्‍या प्रोमोमध्ये अभिषेक कुमारच्या आक्रमक वागणुकीला प्रतिसाद म्हणून करण जोहरनं त्याला चांगलंच झापलं. तेव्हा यामागचा एक क्षण उलगडतो. क्लिपमध्ये अभिषेक आपला संयम गमावत आहे, त्याचा मायक्रोफोन काढून टाकत आहे आणि आदल्या दिवशी सहकारी स्पर्धक तहलका भाई आणि अरुण मशेट्टी यांच्याशी झालेल्या शारीरिक भांडणानंतर संतप्त किंचाळत असल्याचे दिसत आहे.

करण म्हणाला, "तू, (अभिषेक) या घरात सातत्याने मर्यादा ओलांडल्या आहेत. तुझी ही प्रतिक्रिया सामान्य नाही." अभिषेकनं याला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की करणचा संपूर्ण परिस्थितीबद्दल गैरसमज झाला आहे. होस्ट कधी बोलू शकतो किंवा गप्प राहू शकतो हे सांगण्याच्या त्याच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत करण अभिषेकला झापतो तेव्हा वातावरण तंग होऊन जाते. "मी कधी बोलावं किंवा शांत राहावं हे सांगण्याचा तुला काय अधिकार?" असे करण जोहरनं भडकून सांगितलं.

कलर्स टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला रात्री 9:30 वाजता रिअॅलिटी शो प्रसारित होतो.

Also read:

  1. अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकूळ, पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  2. शाहरुखनं सांगितली त्याची 'कमजोरी', फिल्मोग्राफीमध्ये 'डंकी'ला दिलं विशेष स्थान
  3. 'तो काही छोटा अ‍ॅनिमल नाही', म्हणत आलिया भट्टनं व्यक्त केलं रणबीरवरील प्रेम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.