महाराष्ट्र

maharashtra

VIDEO: विषारी सापाशी खेळणे बेतले तरुणाच्या जीवावर, शेवटचे क्षण मोबाईलमध्ये कैद

By

Published : Jul 28, 2021, 6:16 PM IST

विषारी सापाशी खेळ कसा जीवावर बेतू शकते हे आज पुन्हा एकदा मुंब्र्यातील घटनेवरुन सिद्ध झाले आहे. मुंब्र्यातील संजयनगर येथे राहणारा 20 वर्षीय मोहम्मद याला विषारी सापाशी खळणे महागात पडले आहे. त्याने सापाला पकडले असता त्याची पकल सैल होताच सापाने त्याचा तीन वेळा चावा घेतला. मोहम्मदच्या शरीरात विष भीनल्याने त्याला त्रास होऊ लागला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विषारी सापाशी खेळणे बेतले तरुणाच्या जीवावर
विषारी सापाशी खेळणे बेतले तरुणाच्या जीवावर

ठाणे -विषारी सापाशी खेळ कसा जीवावर बेतू शकते हे आज पुन्हा एकदा मुंब्र्यातील घटनेवरुन सिद्ध झाले आहे. मुंब्र्यातील संजयनगर येथे राहणारा 20 वर्षीय मोहम्मद याला विषारी सापाशी खळणे महागात पडले आहे. त्याने सापाला पकडले असता त्याची पकल सैल होताच सापाने त्याचा तीन वेळा चावा घेतला. मोहम्मदच्या शरीरात विष भीनल्याने त्याला त्रास होऊ लागला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

VIDEO: विषारी सापाशी खेळणे बेतले तरुणाच्या जीवावर, शेवटचे क्षण मोबाईलमध्ये कैद

विषारी सापाशी खेळणे बेतले तरुणाच्या जीवावर

मोहम्मद शेख हा युवक टाईमपास करण्यासाठी मुंब्रा बायपास येथे आला असता त्याला लालकीला ढाब्याजवळ एक विषारी साप दिसला. डोंगराळ भाग असल्याने व डोंगरातच झोपड्या बांधल्याने पावसात अनेक वन्यजीव इथल्या वस्त्यांमध्ये घुसतात. केवळ मजा म्हणून मोहमदने सापाचे डोके आपल्या हातात धरून सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळले. तशाच अवस्थेत तो गावदेवी मार्केट परिसरात फिरत असताना अनेकांनी त्याला हटकले व सापाला सोडून देण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मोहम्मदचे मित्र त्याचे चाळे मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. खेळता खेळता त्याची पकड सैल होताच सापाने तीन वेळा त्याचा चावा घेतला. परंतु त्यावेळी त्याला काहीच जाणवले नाही. काही वेळाने त्याने सापाला एका झुडपात सोडून दिले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मोहम्मदच्या शरीरात विष भिनल्याने त्रास होऊ लागला होता. दरम्यान, त्याला तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भर्ती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

कोणत्याही सापाशी मस्ती नको -

या घटनेनंतर आता वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे. पावसात साप बाहेर पडतात आणि त्यामुळे मानवी वस्तीत भीतीने ते हल्ला करतात म्हणून सापाशी मस्ती करणे जीवावर बेतू शकते. मात्र त्यामुळे सापाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. म्हणून वनविभागाने सर्प मित्राशिवाय कोणीही सापाशी खेळू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -VIDEO : अतिवृष्टीने नदीवरील पूल गेला वाहून, मानवी साखळी करून नागरिकांना वाचवतानाचा पाहा थरारक व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details