महाराष्ट्र

maharashtra

नवी मुंबईत २०२० मध्ये सायबर गुन्ह्यांत तिप्पटीने वाढ

By

Published : Jan 17, 2021, 3:29 AM IST

Updated : Jan 17, 2021, 3:53 AM IST

नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत वार्षिक गुन्ह्यांची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात गुन्हे घटले होते. मात्र, २०२० या वर्षात नवी मुंबईत सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे.

वार्षिक गुन्हे आढावा
वार्षिक गुन्हे आढावा

नवी मुंबई- कोरोनाची स्थिती राहिलेल्या २०२० या वर्षात नवी मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण तीन टक्क्यांनी घटले. तर सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाल्याची माहिती नवीन मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत वार्षिक गुन्ह्यांची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात गुन्हे घटले होते. मात्र, २०२० या वर्षात नवी मुंबईत सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. २०१९ च्या तुलनेत सायबर गुन्हे तिप्पटीने जास्त असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त बी. जी. शेखर पाटील यांनी दिली.

सायबर गुन्ह्यांत तिप्पटीने वाढ

हेही वाचा-बेकायदा पिस्तुल विक्री करणारे दोघे जेरबंद; ६ काडतुसे जप्त

सायबर गुन्ह्यांचे पोलिसांसमोर आव्हान-

२०२० मध्ये २७४ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील फक्त २१ गुन्ह्यांची उकल झाली आहे. सायबर गुन्हे उकल होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची उकल करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. टाळेबंदीमध्ये ऑनलाइन व्यवहार वाढल्याने ओटीपी, क्यूआर कोडचा वाप अशावेळी ५५ तर ‘ओएलएक्स’वरून ३२, फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीतून ४, ऑनलाइन फसवणुकीचे १०९ गुन्हे घडले आहेत. कार्ड क्लोनिंगचे १५ तर ऑनलाईन नोकरीच्या आमिषातून ९ असे असे एकूण २३२ गुन्हे घडले आहेत. तर १ हजार ६०० पेक्षा अधिक तक्रारी सायबर शाखेकडे आल्या आहेत.

हेही वाचा-किरकोळ कारणावरून मित्राने मित्राची दुचाकी पेटवली; दहा दुचाकी जळून खाक


कोरोनाच्या काळात गुन्ह्यात घट
शहरात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १ हजार ५५६ गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती पोलीस आयुक्त विपिनकुमार सिंह यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे गुन्ह्यात तीन टक्क्यांनी घट झाली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ७४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर १२ गुन्ह्यांची उकल झाली होती.

Last Updated : Jan 17, 2021, 3:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details