सोलापूर अस्थी विसर्जनासाठी गेलेला तरुण सीना नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या किशोर डिगाजी व्हटकर(वय 27 वर्ष) यांच्या काकांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आपल्या काकांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील सीना नदीच्या बंधाऱ्यावर सोमवारी सायंकाळी किशोर गेला होता. त्यांच्यासोबत कुटुंबीय आणि नातेवाईक देखील होते. यावेळी अस्थीचे विसर्जन करताना किशोर व्हटकर या तरुणाचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. नदीचा प्रवाह अधिक असल्याने नदी पात्रात कुटुंबियांसमोर किशोर वाहून गेला होता. 31 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टिमला त्याच मृतदेह सापडला.
किशोरला वाचवण्याचा प्रयत्न केला पण हात निसटलानदीच्या वाहत्या पाण्यात पडलेल्या किशोरच्या मदतीसाठी नातेवाईक पुढे धावले होते. त्याच्या आधारासाठी दोघांनी हात दिला होता पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हात निसटल्यामुले ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला होता. पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या किशोरला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो पाण्याबरोबर वाहत गेला होता. किनाऱ्यावर नातेवाईक असून देखील त्यांना काही करता आले नाही. नातेवाईकांनी प्रचंड आरडाओरडा केला पण त्याने काहीच झाले नाही. सत्तावीस वर्षांचा तरुण नातेवाईकांच्या डोळ्यादेखत नदीच्या पाण्यात वाहून गेला.