महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या दोन भावांना अटक

By

Published : Aug 22, 2022, 8:36 AM IST

ग्रामीण भागात होत असलेल्या घरफोड्याबाबत पोलीस तपास करत होते. सुरुवातीला क्राईम ब्रँचने माळशिरस पोलिस ठाण्याकडील नोंद असलेला एक गुन्हा उघडीस आणला यात ४ लाख ६७ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना गुन्हयातील संशयीत आरोपी हे पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने एपीआय धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघा संशयीत आरोपींना खेडभोसे ता. पंढरपूर येथून ताब्यात घेतले.

solapur rural police arrested two brothers for housebreaking
सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या दोन भावांना अटक

सोलापूरस्थानिक गुन्हे शाखेने दोघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. या दोघा सख्ख्या भावांनी एक टोळी तयार करून सोलापुरातील ग्रामीण भागात 28 घरफोड्या केल्या होत्या. ग्रामीण भागात असलेली बंदिस्त घरे व बंद दुकाने फोडून सोने,रोख रक्कम,दुचाकी वाहने असा मुद्देमाल लंपास केला होता. या सराईत गुन्हेगार टोळीतील दोघा सख्ख्या भावाना जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी दोघा संशयीत आरोपींना अटक केली आहे तर तिघे सख्खे भाऊ फरार आहेत.

चोरीचे गुन्हे उघडया मोठ्या कारवाईमुळे 28 घरफोडीचे व २ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड झाले आहे आणि १५ लाख ६१ हजार ६०० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी 28 घरफोड्या करणाऱ्या रवी उर्फ बबूल्या मोहन काळे, विजय उर्फ फुल्या मोहन काळे रा. दाळे गल्ली ,पंढरपूर,सध्या रा खेडभोसे ,ता पंढरपूर असे अटक संशयीत आरोपींची नावे आहेत. तर बबन अंकुश पवार रा. पंढरपूर, जि सोलापूर, कालिदास अंकुश पवार रा .पंढरपूर,जि सोलापूर, नवनाथ अंकुश पवार रा पंढरपूर,जि सोलापूर हे तिघे फरार आहेत.

दोघा सख्ख्या भावांनी तिघांना सोबत घेत पाच जणांची टोळी केली रवी उर्फ बबूल्या मोहन काळे, विजय उर्फ फुल्या मोहन काळे रा दाळे गल्ली , पंढरपूर,सध्या रा खेडभोसे ,ता पंढरपूर या दोघा सख्खा भावांनी चोऱ्या करण्यासाठी टोळी तयार केली. शेजारी राहणाऱ्या तिघां सख्ख्या भावांना या टोळीत सामावून घेतले. यामध्ये बबन अंकुश पवार (रा पंढरपूर, जि सोलापूर), कालिदास अंकुश पवार (रा पंढरपूर,जि सोलापूर), नवनाथ अंकुश पवार(रा पंढरपूर, जि सोलापूर) यांना टोळीत घेतले. सोलापुरातील ग्रामीण भागात 28 घरफोड्या केल्या.पोलिसांनी अटक केल्या वर त्यांच्या कडून 15 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


असा लागला संशयीत आरोपींचा शोधग्रामीण भागात होत असलेल्या घरफोड्याबाबत पोलीस तपास करत होते. सुरुवातीला क्राईम ब्रँचने माळशिरस पोलिस ठाण्याकडील नोंद असलेला एक गुन्हा उघडीस आणला यात ४ लाख ६७ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना गुन्हयातील संशयीत आरोपी हे पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने एपीआय धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघा संशयीत आरोपींना खेडभोसे ता. पंढरपूर येथून ताब्यात घेतले.आणि कसून तपास व चौकशी केली.संशयीत आरोपींनी गुन्हयातील सहभागा बाबत कबुली दिली तसेच सखोल व कौशल्यपूर्ण तपासाअंती आरोपीतांनी त्यांचे अन्य तीन साथीदारांसोबत जिल्हयातील अनेक भागात बंदिस्त घरे व बंद दुकानांचे दरवाज्याचे कोयंडे तोडून, खिडकीचे ग्रील उचकटून 28 ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली.

साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्तसंशयीत आरोपी व दोघा सख्ख्या भावांकडून ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचांदीचे दागिने असा एकूण १५ लाख ६१ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, एपीआय धनंजय पोरे, पीएसआय राजेश गायकवाड, एएसआय बिराजी पारेकर, मुढे, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, रवि माने, मोहिनी भोगे, अनिस शेख, व्यंकट मोरे, सायबर सेल तसेच अंगुली मुद्रा विभागाचे एपीआय गुळवे, सादुल, छत्रे यांनी बजावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details