महाराष्ट्र

maharashtra

शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन; शिक्षणाधिकारी आंदोलनात येऊन स्वीकारले निवेदन

By

Published : May 29, 2022, 7:22 PM IST

सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आंदोलनात येऊन आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची समजूत काढली. मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यांच्या सर्व मागण्या शासन स्तरावर पोहोचवू, असे आश्वासन दिले.

teachers protest in front of collector's office
शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सोलापूर - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी सहभाग घेतला होता.शिक्षणाधिकाऱ्यांसोबत आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा बैठका घेऊन आपल्या मागण्या समोर ठेवल्या पण एकही मागणी आजतागायत मान्य झाली नाही अशी खंत शिक्षक सुरेश पवार यांनी बोलताना व्यक्त केली. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन त्यांसोबत चर्चा केली आणि त्यांची समजूत काढून त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच आंदोलन मागे घेण्यास सांगितले.

प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या -
1)विस्तार अधिकारी पदोन्नतीचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्यात यावे.

2)केंद्र प्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया 31 मे 2022 पर्यंत त्वरित राबविण्यात यावी.

3)समाजशास्त्र व भाषा शिक्षक नकार मंजूर करून विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्यात.

4)सेवेतील प्राथमिक शिक्षकांना आजतागायत निवडश्रेणीचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे तातडीने सेवेतील शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्यात यावा.

5)प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावे.

6)कन्नड माध्यम मुख्याध्यापक समायोजनाचे आदेश तातडीने निर्गमित करावेत.व उर्दू माध्यमांच्या अतिरिक्त मुख्याध्यापकांचे रिक्त पदी तातडीने समायोजन करावे.

7)मराठी ,कन्नड,व उर्दू माध्यम बिंदूनामावली तातडीने अद्ययावत करण्यात येऊन तपासणी करून अंतिम करण्यात याव्यात.बिंदू नामावली पूर्ण नसल्याने आंतरजिल्हा बदली धारक शिक्षक बदली पासून वंचित आहेत.

8)DCPS धारकांची रक्कम NPS खात्यावर वर्ग करण्यात यावी.तसेच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची रक्कम वर्ग करणेबाबतची कार्यवाही तातडीने व्हावी.

9)पदोन्नती प्रक्रिया रिक्त पदे आणि सर्व संभाव्य रिक्त पदांचा विचार करून राबविण्यात यावी.

10)दुष्काळग्रस्त व टंचाईसदृश्य भागातील शाळांचे शालेय पोषण आहार योजनेचे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे

शिक्षणाधिकाऱ्यांनी आंदोलनात येऊन काढली समजूत -सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आंदोलनात येऊन आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची समजूत काढली. मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यांच्या सर्व मागण्या शासन स्तरावर पोहोचवू, असे आश्वासन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details