महाराष्ट्र

maharashtra

Ranjitsingh Disale Guruji Resign: ग्लोबल टिचर रणजितसिंह डीसले गुरुजींचा राजीनामा

By

Published : Jul 12, 2022, 8:09 PM IST

आंतरराष्ट्रीय ग्लोबर टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डीसले (Global Teacher Ranjitsingh Disale Guruji) गुरुजीनी, माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कडे 7 जुलै 2022 रोजी राजीनामा (Ranjitsingh Disale Guruji resigns) सादर केला. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे (Zilla Parishad Primary Education Department) शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माहितीस दुजोरा दिला. सतत गैरहजर राहिल्या प्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेने रणजितसिंह डीसले यांच्याबाबत चौकशी अहवाल तयार केला होता. तेव्हा,कारवाई होण्याअगोदर डीसले यांनी राजीनामा मंजूर व्हावा, असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले.

Ranjit Singh Deesle
रणजितसिंह डीसले

सोलापूर:आंतरराष्ट्रीय ग्लोबर टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डीसले (Global Teacher Ranjitisngh Disale Guruji) गुरुजीनी राजीनामा अर्ज दिला. राजीनामा मंजूर व्हावा म्हणून रणजितसिंह डीसले यांनी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कडे 7 जुलै 2022 रोजी राजीनामा (Ranjitsingh Disale Guruji resigns) सादर केला. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे (Zilla Parishad Primary Education Department) शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माहितीस दुजोरा दिला आहे. सतत गैरहजर राहिल्या प्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेने रणजितसिंह डीसले यांच्याबाबत चौकशी अहवाल तयार केला होता आणि हा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे शिक्षण विभागाने दिला आहे. कारवाई होण्याअगोदरच डीसले यांनी राजीनामा मंजूर व्हावा, असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले.


रणजितसिंह यांचा चौकशी अहवाल सादर:सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी 2017 ते 2020 या कालावधीत काय केले? याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनियरित्या सादर करण्यात आला आहे. परंतु सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे अगोदर आषाढीवारी ला गेलेत आणि आता कोरोना पॉजीटिव्ह झाले असल्याने, डीसले गुरुजींचा अहवाल सीईओ नी वाचला नाही आणि कारवाई झाली नाही. मात्र रणजितसिंह डीसले यांनी कारवाई होण्याअगोदर 7 जुलै रोजी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे राजीनामा सादर केला.

डायटकडे फिरकलेच नाहीत डिसले:जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते 'डायट'कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर अवाॅर्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला होता.


चौकशी अहवाल तयार केला:तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी रणजितसिंह डीसले यांची चौकशी करून अहवाल तसाच ठेवला होता. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवला होता. कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा मिळाली. त्याचवेळी डीसलेंनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. या आरोपाचे खंडन करण्यास त्याचा पुराव्यानिशी खुलासा व पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले होता. मग, त्यांनी माफीनामा सादर केला होता.

हेही वाचा:वजन घटवण्यासाठी उपवास करणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

ABOUT THE AUTHOR

...view details