महाराष्ट्र

maharashtra

ज्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतंय, त्याच्याबद्दल मी कशाला भाष्य करू - शरद पवार

By

Published : Feb 14, 2021, 11:39 AM IST

Updated : Feb 14, 2021, 11:45 AM IST

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द.वी कणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित खयाल यज्ञ या संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला हाणला.

Sharad Pawar's criticism of Chandrakant Patil
Sharad Pawar's criticism of Chandrakant Patil

पुणे -महत्त्वाच्या लोकांबद्दल मी बोलावं. ज्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतंय त्याच्यांबद्दल मी कशाला भाष्य करावं, अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द.वी कणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित खयाल यज्ञ या संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते.

शरद पवार पत्रकारांशी बोलताना
त्यांचं विधान प्रत्येकाची चिंता वाढवणारं -
शरद पवार म्हणाले, की गेल्या आठवड्यात माझ्या वाचनात असं आलं आहे, की देशाच्या पंतप्रधानांनी एका सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या बैठकीत या देशातील न्याय संस्था किती उच्च दर्जाची आहे अशा प्रकारचं विधान केले होतं. त्यामुळे साहजिकच आम्हा लोकांना आनंद झाला. पण जे सरन्यायाधीश होते आणि भारत सरकारने ज्यांना संसदेत आमच्याबरोबर पाठवले त्यांनी जे विधान केलं आहे. ते अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचं आहे. त्यांनी एक प्रकारे या न्याय संस्थेविषयी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला का, हे मला ठाऊक नाही पण त्यांचे विधान प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण करणारे आहे. याबाबत माझ्या मनात शंका नाही असं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं.मी संगीताच्या कार्यक्रमाला आलो आहे. त्यामुळे येथं चीन, पाकिस्तान, मोदी काढायची आवश्यकता नाही असंही यावेळी शरद पवार म्हणाले.
Last Updated : Feb 14, 2021, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details