महाराष्ट्र

maharashtra

सुट्टीसाठी काय पण.. पोलीस कर्मचाऱ्याचे वरिष्ठांना हटके स्टाईल पत्र, वाचा..

By

Published : Jun 2, 2022, 11:07 AM IST

पुण्यात कधी काय होईल याचा कोणालाच नेम नसतो. ती म्हण आहे आहे ना, पुणे तिथे काय उणे. अशीच काहीशी प्रचिती पुण्यात घडली आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन येथे सेवेत रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सुट्टीसाठी वरिष्ठ पोलिसांना हटके स्टाईलने पत्र दिले आहे.

pune police personal letter for hoilday viral
पोलीस सुट्टी अर्ज पुणे

पुणे - पुण्यात कधी काय होईल याचा कोणालाच नेम नसतो. ती म्हण आहे आहे ना, पुणे तिथे काय उणे. अशीच काहीशी प्रचिती पुण्यात घडली आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन येथे सेवेत रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सुट्टीसाठी वरिष्ठ पोलिसांना हटके स्टाईलने पत्र दिले आहे.

पत्र

हेही वाचा -Maharashtra rainfall : राज्यात सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याची शक्यता - डॉ. रामचंद्र साबळे

आपल्या सहकाऱ्यासाठी चिलापी आणि रव मासे घेऊन यायचे आहे, 2 दिवस सुट्टी द्या, असे या पत्रात या पोलीस कर्मचाऱ्याने नमूद केले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या या पत्राची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

काय लिहिलं आहे पत्रात -उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की माझी साप्ताहीक सुट्टी दिनांक २९/०५/२०२२ रोजी असून माझे मुळ गावी मु.पो. वाशींचे जि. सोलापूर येथून खडक पो. स्टेशनचे माझे सहकारी यांच्यासाठी चिलापी व रव मासे घेवून येणे असल्याने मला दिनांक २९/०५/२०२२ रोजीची साप्ताहीक सुट्टी जोडून दिनांक ३०/०५/२०२२ रोजीची एक दिवस किरकोळ रजा मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मिळण्यास विनंती आहे, असे पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा -Anil Parab Replied To Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमैयांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही - अनिल परब

ABOUT THE AUTHOR

...view details