महाराष्ट्र

maharashtra

Balasaheb Thorat On Rajya Sabha Election : आमच्याकडे चौथ्या उमेदवाराचा आकडा आहे, विजय होणारच - बाळासाहेब थोरात यांचा दावा

By

Published : Jun 4, 2022, 12:40 PM IST

राज्यसभेची निवडणूक ही होणार असून यावर आता प्रत्येक पक्षीय नेते मंडळी आपले मत मांडत आहेत. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( revenue minister Balasaheb Thorat ) यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षाचे आणि अपक्ष सदस्य संख्या ही आमच्याकडे आहे. त्यामुळेच आमचा चौथा उमेदवार हा विजयी होणार आहे. असा विश्वास यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ( Balasaheb Thorat On Rajya Sabha Election )

Balasaheb Thorat On Rajya Sabha Election
बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

पुणे - राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेची निवडणूक ही होणार असून यावर आता प्रत्येक पक्षीय नेते मंडळी आपले मत मांडत आहेत. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( revenue minister Balasaheb Thorat ) यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षाचे आणि अपक्ष सदस्य संख्या ही आमच्याकडे आहे. त्यामुळेच आमचा चौथा उमेदवार हा विजयी होणार आहे. असा विश्वास यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ( Balasaheb Thorat On Rajya Sabha Election )

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

तिन्ही पक्षाचे आणि अपक्ष सदस्य संख्या आमच्याकडे - पुण्यातील मांजरी येथे राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. काल जो काही माहविकास आघाडी सरकारकडून निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जो प्रस्ताव देण्यात आला होता. हे स्वाभाविकच आहे. संवाद तर असावाच लागतो. जरी पक्ष विरोधीपक्ष वेगळे असेल तरी संवाद हा असावाच लागतो. आम्ही हेच दाखवून देत होतो आमच्याकडे चौथ्या उमेदवाराच्या विजयीसाठी आकडा आहे. त्यांना ते मान्य झाले नाही पण आमच्याकडे विजयासाठी मतदान आहे. आमच्या तिन्ही पक्षाचे आणि अपक्ष सदस्य संख्या आमच्याकडे आहे. त्यामुळे आमचा उमेदवार हा विजयी होणार आहे, असे देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

आपल्याला मुकुल वासनिक यांच्या रूपाने राजस्थानमधून उमेदवारी - काँग्रेसमधील नाराजीबद्दल बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नाहीये ती नाराजी फक्त मला टीव्ही चॅनलवरच दिसते. जरी काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील युवा नेत्याला उमेदवारी दिली आहे. तरी आपल्याला ही मुकुल वासनिक यांच्या रूपाने राजस्थानमधून उमेदवारी मिळाली आहे. हा देश एक आहे. राज्यसभा ही केंद्रीय सभा आहे. त्यामुळे काँग्रेसने एक चांगल उदाहरण घालून दिली आहे. असे देखील यावेळी थोरात म्हणाले.

त्यांना नेमके काय म्हणायचं - काल काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी जाहीर करत राहुल गांधी 4 वर्षापासुन भेटलेच नाही अस म्हटल यावर बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना नेमके काय म्हणायचं आहे, हे अद्याप मला कळलेले नाही. असे देखील यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला - काल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे म्हणाले होते. यावर बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असलो तरी, आम्हाला आपआपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. तिघांनीही असा प्रयत्न केला पाहिजे की मुख्यमंत्री पदाचा आपला आकडा पुढे गेला पाहिजे. भाजपची कार्यप्रणाली, विचारसरणी आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही एकत्र आहोत. शेवटी आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे. असे देखील यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनावर अवलंबून -वडेट्टीवार

ABOUT THE AUTHOR

...view details