महाराष्ट्र

maharashtra

बिहारमध्ये शिवसेनेचं काय झालं? भाजप नेत्याचा संजय राऊतांना खोचक सवाल

By

Published : Nov 10, 2020, 5:35 PM IST

Updated : Nov 10, 2020, 5:55 PM IST

'महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सर्वाधिक जागा निवडूून दिल्या होत्या. परंतु तिघाडी सरकारने जनतेच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. परंतु, आता मात्र बिहार निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तोंडावर आपटले आहे. बिहारच्या निकालामुळे या सरकारमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही,' असे शिंदे यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये शिवसेनेची स्थिती न्यूज
बिहारमध्ये शिवसेनेची स्थिती न्यूज

पुणे -अवघ्या काही तासांमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. सध्यातरी बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांची एनडीए आघाडीवर असल्याचे चित्र आहे. बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेने 23 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु यातील सर्वच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे नेते आणि माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मात्र शिवसेनेची खिल्ली उडवताना बिहारमध्ये शिवसेनेचे काय झाले, असा खोचक सवाल संजय राऊत यांना विचारला आहे.

हेही वाचा -हिंदी पट्ट्यातील बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सर्वात शेवटी यश..

'बिहारमध्ये शिवसेनेचं काय झालं?'

राम शिंदे म्हणाले, 'ज्या वेळेस बिहार निवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आम्हीसुद्धा बिहारमध्ये निवडणुका लढवू अशा घोषणा केल्या होत्या. खासकरून संजय राऊत यांना मी विचारू इच्छितो की, बिहारमध्ये शिवसेनेचं काय झालं? किती जागा लढल्या? किती मतदान झाले? आपण महाराष्ट्रात राहून बिहारमध्ये निवडणूक लढणार होता त्याचे काय झाले, हे त्यांनी आता पुढे येऊन जनतेला सांगण्याची गरज आहे.'

बिहारमध्ये शिवसेनेचं काय झालं? भाजप नेत्याचा संजय राऊतांना खोचक सवाल
'महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सर्वाधिक जागा निवडूून दिल्या होत्या. परंतु तिघाडी सरकारने जनतेच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. परंतु, आता मात्र बिहार निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तोंडावर आपटले आहे. बिहारच्या निकालामुळे या सरकारमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही,' असे शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -महाराष्ट्रातील चूक भाजप बिहारमध्ये सुधारेल - अनिकेत जोशी

'देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असलेले अभ्यासू नेतृत्व'

'देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असलेले अभ्यासू नेतृत्व, प्लॅनर आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जेव्हा ते बिहारमध्ये गेले, तेव्हा त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन योजनाबद्ध नियोजन केले. दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे अंतिम टप्प्यात ते बिहारमध्ये जाऊ शकले नाहीत. ते दूरदृष्टीचे नेते असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे बिहार निवडणूक विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचेदेखील योगदान महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीए जिंकेल. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचे योगदानदेखील बिहार निवडणुकीत महत्त्वाचे आहे,' असे राम शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असलेले अभ्यासू नेतृत्व - राम शिंदे

'एक्झिट पोल आणि सी व्होटर यांची मते सपशेल फेल'

'बिहार निवडणुकीच्या निकालादरम्यान सध्या एनडीए आघाडीवर आहे. याचा अर्थ एक्झिट पोल आणि सी व्होटर यांची मते सपशेल फेल होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या विरोधात जनमत जाणार असा समज पसरवला जात होता, तो आता खोटा ठरताना दिसत आहे. बिहार राज्याला पुढे घेऊन जात असताना नितीश सरकारने दळणवळणाची साधने निर्माण केली, शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या, वीज जोडणी दिल्या, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविले. याला बिहारच्या जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळताना दिसत आहे. अंतिम निकालही एनडीएच्या बाजूनेच लागेल आणि बिहारमध्ये फक्त एनडीएचेच सरकार येईल. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे,' असे भाजप नेते शिंदे म्हणाले.

हेही वाचा -बिहार विधानसभा निवडणूक : निकाल राज्य सरकारला धडकी भरवणारे - खोपडे

Last Updated : Nov 10, 2020, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details