महाराष्ट्र

maharashtra

Balgandharva Rang Mandir : पुण्याची शान 'बालगंधर्व रंगमंदिर', ५४ वर्ष नाट्यरसिकांच्या अविरत सेवेचे पर्व

By

Published : May 19, 2022, 6:08 PM IST

Updated : May 19, 2022, 6:43 PM IST

पुणे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचं स्थान असलेले आणि सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेले बालगंधर्व रंगमंदिर ( balgandharva rang mandir pune ) लवकरच पाडले जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडल्यानंतर त्याठिकाणी बहुमजली आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त रंगमंदिर संकुल उभारण्यात येणार आहे.

balgandharva rang mandir
बालगंधर्व रंगमंदिर

पुणे- पुण्यातील 'बालगंधर्व रंगमंदिर' ( balgandharva rang mandir pune ) ही वास्तू म्हणजे पुण्याची शान आणि पुणेकरांसाठी अभिमान. मात्र, शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचं स्थान असलेले आणि सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेले बालगंधर्व रंगमंदिर लवकरच पाडले जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडल्यानंतर त्याठिकाणी बहुमजली आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त रंगमंदिर संकुल उभारण्यात येणार आहे. आजवर पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि पुण्यातील अनेक पिढ्यांचे मनोरंजन करणाऱ्या 'बालगंधर्व'च्या पर्वाचा अस्त होणार असेच म्हणावे लागेल. या बालगंधर्व रंगमंदिराचा नेमका इतिहास काय हे आज आपण जाणून घेऊया...

५४ वर्षांच्या काळात नाट्यरसिकांची अविरत सेवा -बालगंधर्व नाट्यगृहाच्या निर्मितीचा इतिहास रंजक आहे. तेव्हाचं पुणे हे 1961 साली पानशेत धरण फुटल्यामुळे आलेल्या आपत्तीमधून सावरत होते. अशातच मुठा नदीच्या काठावर विस्तीर्ण जागेत अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे एक नाट्यगृह बांधावे अशी संकल्पना जेव्हा पूढे आली तेव्हा त्याला विरोध झाला. काहींनी शहरापासून दूर असल्याचे कारण सांगितले. तर काहींनी त्या भागातले झोपडपट्टीवासी कुठे जातील असा प्रश्न उपस्थित केला. अखेर खुद्द बालगंधर्वांच्या हस्ते ८ ऑक्टोबर १९६२ रोजी भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, २६ जून १९६८ ला रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच महापालिकेच्यावतीने या वास्तूचे नूतनीकरणही करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिराने १९६८ ते २०२२ या ५४ वर्षांच्या काळात नाट्यरसिकांची अविरत सेवा करत आहे.

कलाकारांच्या प्रतिक्रिया

...म्हणून देण्यात आले बालगंधर्व यांचे नाव - बालगंधर्वांचा सन्मान करण्याच्या हेतूने या रंगमंदिराला त्यांचे नाव देण्यात आले. यामागेही अनेक कारणे आहेत. बालगंधर्वांचं पुण्याशी अगदी हृद्य नाते होते. त्यांचा जन्म पुण्यातच झाला. लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्क ही उपाधीही पुण्यातच दिली. गंधर्क नाटक मंडळीची स्थापना पुण्यातच झाली अन् पुण्यातच अनंतात विलीन झाले. नटसम्राट बालगंधर्व यांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ प्राप्त करून दिला. त्यांचे उचित असे स्मारक पुण्यामध्ये असावे. अशी सर्व रसिक प्रेक्षकांतून आणि कला वर्तुळातूनही इच्छा व्यक्त होत होती, अन् ते बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने उभे राहिले. यासाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडेंनी यांनी पुढाकार घेतला आणि पुढे 1966 साली हे नाट्यगृह उभारले गेले.

अशी आहे बालगंधर्व रंगमंदिरात व्यवस्था -बालगंधर्व रंगमंदिर 22 हजार चौरस फूट जागेवर उभे असून या बालगंधर्व रंगमंदिरात एक नाट्यगृह असून यात 1 हजार आसन क्षमता आहे. तसेच अतिशय सुंदर अशी बालकनी आहे. तसेच 4 ते 5 अद्यावत असे कलाकारांसाठी मेकअप रूम आहे. आणि विशेष म्हणजे याच बालगंधर्व रंगमंदिरात कलाकारांसाठी 8 ते 10 आराम कक्ष बनविण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर एक कलादालन आहे. कलाकारांसाठी कट्टा, कँटीन, तसेच आजूबाजूला वाहनतळ आणि मोठ्या प्रमाणात झाडे देखील लावण्यात आली आहे.

अनेक दिग्गजांची आणि अनेक राजकीय मंडळींची झाले या ठिकाणी कार्यक्रम -असंख्य नाट्यकृती या बालगंधर्व रंगमंदिरात बहरल्या. संगीताचे कार्यक्रम, मैफली, लावण्या, सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध संमेलने या ठिकाणी झाल्या. असंख्य कलाकारांनी या रंगभूमीवरून कलेची सेवा केली. नटसम्राट बालगंधर्व म्हटले की कलाक्षेत्रातील प्रत्येकजण नतमस्तक होतो. त्यामुळे राज्यभरातील सर्वच ज्येष्ठ कलाकारांनी या ठिकाणी आपले कार्यक्रम, नाटक सादर केले तर अनेक कलाकारांचे करीअर त्या रंगमंदिरात घडलंय. त्यामुळे अनेक नट, गायक यांच्यासाठी ते नाट्यगृह म्हणजे मंदिरच आहे. हे रंगमंदिर म्हणजे एक सांस्कृतिक ठेका आहे. तसेच फक्त कलाकार नव्हे तर विविध राज्यातील मुख्यमंत्री, तसेच आजी माजी पंतप्रधान तसेच देशभरातील अनेक मंत्र्यांच या रंगमंदिरात कार्यक्रम देखील झाले आहेत.

स्ट्रक्चर ऑडिट करून त्याची डागडुजी करण्यात यावी -बालगंधर्व रंगमंदिर या वास्तूशी अवघ्या कलासृष्टीचे आणि पुणेकरांचे भावनिक नाते आहे. पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणारे, दर्शवणारे हे रंगमंदिर गेली पन्नास वर्षाहुन अधिक काळापासून कलेच्या सेवेत दिमाखाने उभे आहे. अनेक सांस्कृतिक सोहळ्यांचे, दिग्गज कलाकारांच्या स्मृतींचे आणि त्यांच्या सान्निध्यात उजळलेल्या क्षणांचे साक्षीदार आहे. यामुळेच बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा रंगमंदिराचा विकास आणि भावनिक नाते या गोष्टींबाबत अडखळला आणि चर्चांना उधाण आले. मागील अनेक वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास आणि त्याविषयीच्या चर्चा होत होत्या. आता या रंगमंदिराचा पुनर्विकास होणार असे जाहीर करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका व सरकारतर्फे बालगंधर्क रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार झाल्याचे व नवीन बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दर्शवल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आताचे बालगंधर्व रंगमंदिर 22 हजार चौरस फूट जागेवर उभे असून मूळ वास्तू पाडून 3.5 लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधले जाणार आहे. या नवीन वास्तूत वाहनांची पार्किंग व्यवस्था व जास्त आसनक्षमतेची तीन नाट्यदालने उभी केली जाणार आहेत. रसिक आणि कलाकारांच्या मनावर कोरल्या गेलेल्या या वास्तूच्या पुनर्विकासाबाबत कलाक्षेत्रातून, रसिकांकडूनही तसेच राजकीय मंडळाच्यावतीने देखील आक्षेप घेण्यात येत आहे. बालगंधर्व रंगमंदिर आहे त्या परिस्थितीत ठेवण्यात यावे फक्त जिथे काम करण्याची गरज आहे तसेच याचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी भूमिका कलाकारांनी घेतली आहे.

सर्वच क्षेत्रातून होत आहे विरोध - बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा आता तयार झाल्याचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. त्यांनीच 2018 साली स्थायीसमितीचे अध्यक्ष असताना पुनर्विकासाबाबत प्रस्ताव दाखल केला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवीन बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दाखवल्याचेही मोहोळ यांनी म्हटले आहे. अन आता परत नाट्यक्षेत्रातील कलाकार आणि भाजप वगळता काँग्रेस शिवसेनेच्यावतीने बालगंधर्व पाळू नये म्हणून आंदोलन सुरू झाले आहे.

पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणारं, दर्शवणारं हे रंगमंदिर गेली पन्नास वर्षाहून अधिक काळापासून कलेच्या सेवेत दिमाखाने उभे आहे. हे रंगमंदिर पाळू नये यासाठी नाट्य तसेच कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी आंदोलने देखील उभी केली आहे. जर सरकारने पाळण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी या आंदोलकांनी दिला आहे. असे असताना बालगंधर्व रंगमंदिर पाळण्यात येणार की आहे त्याच परिस्थितीत ते राहणार आहे, हे येणार काळच दाखवणार आहे.

हेही वाचा -Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या 350 फुट पुतळ्याची प्रतिकृतीची तयार, धनंजय मुंडेंनी केली पाहणी

Last Updated : May 19, 2022, 6:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details